रोहित पवारांचा भाजपवर निशाणा ! म्हणाले.. संविधानाबाबत काहीच बोलायचं नाही असंच या सर्वांनी ठरवलंय?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यपाल भगत सिह कोश्यारी हे काल विमानाने एका कार्यक्रमासाठी उत्तराखंड येथे जात होते. तेव्हा त्यांना विमानतळावर गेल्यावर मुख्यमंत्री कार्यालयातुन विमान प्रवासाची परवानगी देण्यात आली नाही. प्रवासाची परवानगी न दिल्यामुळे राज्यात आता राजकीय वातावरण बरंच तापलं असल्याचं दिसत आहे. यावरून भाजप हे राज्य सरकारवर टीका करत असतानाच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये जोरदार टीकाटिपणी सुरु आहे. भाजप आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षावर जोरदार टीका करत असल्यामुळे आता राष्ट्रवादीकडूनही जोरदार प्रत्युत्तर जात आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे.
संविधानाबाबत काहीच बोलायचं नाही असंच त्यांनी ठरवलंय अशी जोरदार टीका रोहित पवार यांनी केली आहे.

आमदार रोहित पवार म्हणाले, राज्यपालांच्या विमान प्रवासाबाबत सरकारने स्पष्टीकरण दिलं तरी सगळे विरोधक एकसुरात टीका करतायेत. पण विधान परिषदेत आमदारांच्या नियुक्तीचं घटनात्मक बंधन वेळेत पाळलं जात नसताना विरोधी पक्षातील एकही नेता यावर का बोलत नाही? की संविधानाबाबत काहीच बोलायचं नाही असंच या सर्वांनी ठरवलंय?, असं म्हणत रोहित पवारांनी थेट भाजपवर निशाणा साधत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.