Hasan Mushrif | राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ; पोलिसांत गुन्हा दाखल

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर पोलिसांकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारखान्यासाठी प्रलोभने दाखवून शेअर्स गोळा करत फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या शेअर्सच्या माध्यमातून हसन मुश्रीफ यांनी 40 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप विवेक कुलकर्णी यांच्याकडून करण्यात आला आहे. मुरगुड पोलीस ठाण्यात हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी ईडीकडून हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापे टाकण्यात आले होते. मात्र कोणती ठोस कारवाई झाली नव्हती. मात्र आता हसन मुश्रीफ यांच्यावर प्रत्यक्षात गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. हसन मुश्रीफ यांनी सहकारी कारखान्यासाठी पैसे गोळा करुन ते वैयक्तिक कामासाठी वापरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यामुळे आता हसन मुश्रीफ यांचे समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत आहे. या षडयंत्रामुळे कोल्हापुरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची राहिल असा इशारा हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांकडून देण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच ईडीकडून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर छापा टाकण्यात आला होता.
यावेळी ईडीकडून बँकेच्या काही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले होते.
त्याअगोदर हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी आणि कार्यालयावरही ईडीकडून छापा टाकण्यात
आला होता. मात्र कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नव्हती.
मात्र आज हसन मुश्रीफ यांच्यावर पहिलाच गुन्हा दाखल केल्याने ईडीच्या कारवाईला वेग येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.

Web Title :- Hasan Mushrif | kolhapur police file fri agaisnt ncp leader hasan mushrif in 40 crore fraud case ed may take further action

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ayushmann Khurrana | बॉलीवूडबाबत अभिनेता आयुष्मान खुरानाने केले मोठे वक्तव्य; म्हणाला “बॉलीवूड मध्ये टॅलेंट…”

Pune Kasba Peth Bypoll Election | हा तर पॉलिटिकल स्टंट, रविंद्र धंगेकरांच्या उपोषणावर देवेंद्र फडणवीसांची टीका

Pune Kasba Peth Bypoll Election | पराभव दिसत असल्याने धंगेकर सहानुभूति निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, भाजपचा धंगेकरांवर आरोप (व्हिडिओ)