‘हसीना दिलरूबा’ बनली तापसी पन्नू, पोस्टर शेअर करून केली नव्या सिनेमाची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  तापसी पन्नू आणि विक्रांत मेसी यांचा आगामी हिंदी चित्रपट हसीना दिलरूबा सध्या खुप चर्चेत आहे. हा एक थ्रिलर चित्रपट असून, त्याचे पहिले पोस्टर खुपच आगळेवेगळे दिसत आहे. या पोस्टमध्ये एक मुलगी दिसत असून तिने आपली साडी थोडी वर उचलली आहे. अणि तिच्या पायांच्या खाली रक्त दिसत आहे. रक्ताच्या एका बाजूला चाकू पडलेला आहे. तर दुसरीकडे वहशी नावाचे एक पुस्तक दिसत आहे.

या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत तापसीने म्हटले आहे की, मैं भले ही बुरी हूं लेकिन मैं बुरी होने में बहुत अच्छी हूं. हसीना दिलरुबा की दुनिया में जाते हुए. मैं आप लोगों के उससे मिलने का इंतजार नहीं कर सकती. १८ सितम्बर २०२० से सिनेमाघरों में.

या चित्रपटाचे दिग्दर्शन विनिल मॅथ्यू करत आहेत, ज्यांनी यापूर्वी परिणीती चोपडा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांना घेऊन ‘हंसी तो फंसी’ चित्रपट बनविला होता. तापसीच्या नव्या चित्रपटाबद्दल अद्याप सविस्तर माहिती उपलब्ध नसली तरी चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाचा विचार करून नवीन जोडीची निवड केली आहे. हा चित्रपट रोमँटिक आणि थ्रिलर असला तरी चित्रपटात विक्रांत मॅसी आणि तापसी पन्नू यांचे कोणते नाते असणार याचा अद्याप खुलासा झालेला नाही.

तापसी पन्नू हसीन दिलरुबा चित्रपटाशिवाय दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या ‘थप्पड’ या आगामी चित्रपटातही काम करत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत दीया मिर्जा आणि रत्ना पाठक दिसणार आहेत. याशिवाय तापसी आणखी दोन बायोपिकमध्येही ती दिसणार आहे. गुजराती अ‍ॅथलिट रश्मी रॉकेट आणि भारतीय महिला क्रिकेटर मिताली राजचा बायोपिक ‘शाबाश मिठू’मध्ये ती काम करत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/