Hasin Jahan | मोहम्मद शमीच्या बायकोला ट्रेनमध्ये आला वाईट अनुभव, TC वर केले गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची (Mohammed Shami) पत्नी हसीन जहाँ (Hasin Jahan) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिने आपल्याला ट्रेनमध्ये आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितले आहे. रेल्वेच्या टीसीने (Railway TC) आपल्यासोबत गैरवर्तन केलं, असा आरोपसुद्धा हसीन जहाँने (Hasin Jahan) यावेळी केला. गुरुवारी रात्री बिहारहून (Bihar) कोलकात्याला (Kolkata) जात असताना टीसीने आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचे तिने आपल्या आरोपांत म्हंटले आहे.

 

काय घडले नेमके?
हसीन जहाँ एका नातेवाईकाच्या लग्नासाठी बिहारला गेली होती. तिथून कोलकात्याला परतत असताना तिच्यासोबत हा प्रकार घडला. जोगबानी एक्स्प्रेसमध्ये (Jogbani Express) तिला अप्पर बर्थ देण्यात आला होता. तसेच “लोअर बर्थ रिकामी होता. सहप्रवाशाच्या विनंतीवरुन हसीन जहाँ लोअर बर्थवर शिफ्ट झाली. गुरुवारी रात्री तिकीट तपासणारा कर्मचारी त्या ठिकाणी आला त्याने माझ्यासोबत गैरवर्तन केलं. त्याने शिवराळ भाषा वापरली. तसेच त्या कर्मचाऱ्याने माझा मोबाइलही फेकला. यानंतर मी पोलिसांची मदत घेतली. यानंतर पोलिसांच्या सुरक्षेत मी कोलकाकत्यात प्रवेश केला” असे हसीन जहाँने आपल्या अनुभवात म्हंटले आहे. याबाबत अधिक चौकशी केली असता या प्रकरणात रेल्वेकडे अजून अधिकृत तक्रार आलेली नाही, असं पूर्व रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणात लक्ष घालून योग्य ती कारवाई करु असे आश्वासनदेखील या अधिकाऱ्याकडून देण्यात आले आहे.

हार्दिक पंड्याचा फोटो पोस्ट केला
मागच्या महिन्यात भारताने आशिया कपमध्ये (Asia Cup) पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवल्यानंतर हसीन जहाँने (Hasin Jahan) सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. यामध्ये तिने हार्दिक पंड्याचा एक फोटो पोस्ट केला होता. यामध्ये तिने हार्दिकच कौतुक करताना शमीवर जोरदार टीका केली होती. हसीन जहाँ मोहम्मद शमीपासून विभक्त झाली असून मागच्या काही काळापासून दोघे वेगवेगळे राहतात. 2018 मध्ये हसीन जहाँने मोहम्मद शमीवर गंभीर आरोप केले होते.

 

Web Title :- Hasin Jahan| hasin jahan estranged wife of cricketer mohammed shami complains of misconduct by railway ticket checker

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | मनसेची उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा जहरी टीका, एक म्हण आठवली, कपटी भावापेक्षा…

Pune Fire News | डेक्कन जिमखान्यावरील चॅम्पियन स्पोर्ट्सला भीषण आग; सर्व साहित्य जळून खाक

Pune Crime | आई, आजीने अल्पवयीन मुलीची घरीच केली प्रसृती; मांजरी, कुत्र्यांमुळे उघड्यावर टाकलेल्या अर्भकाचा जीव वाचला