राममंदिर भूमिपूजनावर हसीन जहाँची पोस्ट, फॅन्सकडून जीवे मारण्याची धमकी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. कधी बोल्ड फोटो, कधी डान्स करतानाचे व्हिडीओ पोस्ट करून हसीन जहाँ चर्चेत राहते. लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावरील तिच्या पोस्टही प्रचंड वाढल्याचे दिसून आले. आता ती आणखी एका पोस्टमुळे चर्चेत आली असून तिनं यावेळी राम मंदिर भूमिपूजनावरून पोस्ट केली आहे. नेटिझन्सने तिचे कौतुक केले नाही तर तिला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

हसीन जहांने पोस्ट केली आहे की, अयोध्यामध्ये श्री राम मंदिर भूमिपूजनासाठी समस्त हिंदू समाजाचे अभिनंदन, सर्वांना खूप खूप शुभेच्छा… शुभेच्छा देताना तिने अनेक इमोजी वापरल्या आणि त्या काहींना पसंत आल्या नाहीत.

2018 मध्ये हसीन जहाँने भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीवर गंभीर आरोप केले होते. शमी आणि त्याच कुटुंबीय छळ करत असल्याचे आरोप करत तिनं पोलीस चौकीत तक्रार दाखल केली होती. याशिवाय तिनं शमीवर फिक्सिंगचे आणि अन्य मुलींसोबत संबंध असल्याचे देखील आरोप केले होते. फिक्सिंगच्या आरोपांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) चौकशी केली होती आणि त्याला निर्दोष मुक्त केले. हसीनानं शमीच्या भावावरही बलात्काराचे आरोप केले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like