Hathras Gang Rape : राहुल गांधी यांना UP पोलिसांकडून अटक

हाथरस (UP) : वृत्तसंस्था – काँग्रेस (Congress )चे खासदार आणि नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी कलम 188 अंतर्गत अटक केली आहे. हाथरस बलात्कार  (hathras gang rape) आणि हत्या प्रकरणातील पिडीतेच्या परिवाराला भेट देण्यासाठी प्रियंका गांधी (Priyanka Gandhi )आणि राहुल गांधी पायी चालत जात होते. त्यावेळी त्यांना पोलिसांनी अडवलं आणि त्यानंतर युपी पोलिसांनी राहुल गांधी यांना अटक केली आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी पोलिसांनी तुम्ही मला का आणि कोणत्या कलमांतर्गत अटक करत आहात असा प्रश्न विचारला. कलम 144 लागू असल्यानं आम्ही तुम्हाला पुढं जाऊ देणार नसल्याचं युपी पोलिसांनी राहुल गांधी यांना सांगितलं. काही वेळानंतर लागलीच राहुल गांधी यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. प्रियंका गांधी आणि राहुल गांंधी हे दोघेही हाथरस प्रकरणातील पिडीतेच्या परिवाराची भेट घेण्यासाठी दिल्लीहून निघाले होते.

मात्र, त्यांचा ताफा पोलिसांनी अडवला. दरम्यान, पोलिसांकडून राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाली. त्यानंतर राहुल गांधी हे रस्त्याच्या कडेला पडले आणि नंतर उठून ते पुन्हा चालू लागले. राहुल गांधी यांना अटक झाल्यामुळं प्रचंड खळबळ उडाली आहे.