Hathras Gangrape Case : खा. सुप्रिया सुळेंचा योगी सरकारवर ‘घणाघात’, म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना समोर आल्यानंतर आता पूर्ण देश संतापला आहे. या प्रकरणी पोलीस आणि प्रशासनानं घेतलेल्या भूमिकेमुळं आता योगी सरकारवर चहुबाजूंनी टीका होत आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी योगी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या अगदी विरोधात कारभार सुरू आहे असा टोल त्यांनी लगावला आहे.

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत योगींवर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे म्हणतात, “बेटी बचओ बेटी पढाओ या केंद्र सरकारच्या अभियानाच्या अगदी विरोधात कारभार उत्तर प्रदेशमध्ये सुरू आहे. हाथरस येथील घटनेनंतर बलरामपूरमधील सामूहिक बलात्कार आणि हत्येची आणखी घटना उजेडात आली. हे कधी थांबणार आहे” असा सवालही त्यांनी केला आहे.

इतकंच नाही तर या अमानुष घटना थांबवण्यासाठी कठोर कायदे करण्यासाठीआपण सर्वांनी मिळून कठोर कयदे करण्याची आणि ते राबवण्याची गरज आहे असं मतंही त्यांनी व्यक्त केलं आहे.

‘योगींनी राजीनामा द्यावा’ : प्रियंका गांधी

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत की, पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांना संरक्षण द्यायचं सोडून योगी सरकारनं त्यांच्या मानवी हक्कांवरच गदा आणण्याचं काम केलं. योगींनी राजीनामा द्यावा.”

मायावती म्हणाल्या, “नातेवाईकांना अंत्यसंस्कार करू न देता पोलिसांनीच परस्पर विधी उरकले हे चुकीचं आहे.”