‘या’ फोटोसाठी खरोखरच पाण्यात पडला होता हतिक रोशन ! व्हिडीओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूडमधील अनेक अॅक्ट्रेस प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानीच्या कॅलेंडरसाठी फोटोशुट करत असतात. त्याला सेलिब्रिटी फोटोग्राफर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. डब्बू प्रत्येक वर्षी आपल्या फोटोशुटमध्ये कोणत्या ना कोणत्या अॅक्ट्रेसला न्यूड किंवा टॉपलेस करतच असतो ज्यामुळं तो चर्चेत येत असतो. अलीकडेच त्यानं हृतिक रोशनचा एक फोटो शेअर केला आहे ज्यात तो स्विमिंग पूलमध्ये पडताना दिसत आहे. त्याच्या हाता वर्तमानपत्रही आहे. अनेकांना असं वाटेल की, हा एडिटेड फोटो आहे परंतु असं अजिबात नाही आणि हा एक रिअल क्लिक फोटो आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी खालील फोटोमध्ये उजव्या बाजूच्या अॅरोवर क्लिक करा. पुढील फोटो आणि व्हिडीओ तुम्ही पाहू शकता.

डब्बूनं अलीकडेच हृतिकचे काही फोटोशुटदरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. फोटोत दिसत आहे हृतिक स्विमिंग पूलाकडे झुकला आहे आणि पेपर वाचत आहे. तुम्हाला कदाचित माहिती नसेल परंतु शुटसाठी त्याला खरंच पाण्यात पडावं लागलं आहे. डब्बूनं याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात याबद्दल खुलासा करण्यात आला आहे. हृतिकला या क्लिकसाठी खरंच स्विमिंग पूलच्या पाण्यात कोसळावं लागलं आहे.

डब्बूनं शेअर केलेले हे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

हृतिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटचा वॉर या सिनेमात दिसला होता. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेता टायगर श्रॉफ प्रमुख भूमिकेत होता.