अनैतिक संबंधांतून मुख्याध्यापकाची आत्महत्या

कोल्हापूर : पोलिसनामा ऑनलाईन – विवाहबाह्य संबंधातील असणाऱ्या वादतून एका महिलेने पोलिसांत तक्रार केल्याने मुख्याध्यापकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना कोल्हापुरात घडली आहे. अण्णासाहेब शिक्षणसंस्थेतील मुख्याध्यापक भास्कर यादव (५२) यांनी गळफास लावून आत्महत्या केली असून या प्रकरणी पोलिसांत तपास सूरु आहे.

विववबाह्य संबंधावरून वाद घालणारी ‘ती’ व्यक्ती कोण

भास्कर यादव हे हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे शिक्षण संस्थेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. शनिवारी सकाळी त्यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी त्यांनी लिहलेल्या चिट्ठीमधे विवाहबाह्य संबंधातील वादाचा उल्लेख त्यांनी केल्याचे समजते. भास्कर यादव यांचे त्यांच्याच शाळेत असणाऱ्या एका शिक्षिकेशी संबंध होते. या महिलेने आपण हे संबंध अधिक घट्ट करण्यासाठी लग्न करू म्हणून त्यांच्याकडे लग्नाचा तगादा लावला. यादव त्यांच्या पत्नीला आणि मुलांनां सोडून त्या शिक्षिकेशी लग्न देखील केले. शिवाय तिला घर आणि गाडीची व्यवस्थाही करुन दिली. परंतु , गेल्या काही दिवसांपासून या दोघांत नेहमी वाद सुरु होते. महिलेचे त्यांच्या व्यतिरिक्त अन्य एका पुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचा यादव यांना संशय होता. त्यामुळे दोघांमधील वाद वाढले होते.

वादाचे प्रमाण वाढल्याने यादव पुन्हा पेठ वडगाव येथे राहणाऱ्या पहिल्या पत्नीसोबत राहायला गेले. दुसरीकडे हातकणंगलेत महिलेने पोलिसांच्या महिला तक्रार निवारण केंद्राकडे तक्रार अर्ज दिला होता. आणि जर तक्रार अर्ज मागे घ्यायचा असेल तर ३० लाख रुपये द्यावे,अशी मागणी देखील तिने यादव यांच्याकडे केली होती. आता आपल्यावर गुन्हा दाखल झाल्यास नोकरी तर जाईलच जाईल शिवाय इज्जत देखील जाईल, या भीतीपोटी त्यांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले,असे पोलीस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी यादव यांच्या पहिल्या पत्नीच्या मुलने देखील पोलीस ठाण्यात महिलेच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us