रात्रीचं जेवण वेळेवर घ्या ! ‘हे’ जबरदस्त फायदे होतील अन् गंभीर आजार दूर करण्यास मिळेल मदत, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइऩ – आजच्या धक्काधक्कीच्या युगात व्यस्त दिनक्रमामुळे अनेक लोक रात्री उशीरा जेवण करतात. रात्री उशीराने जेवण करणे, हे फक्त वजनावरच नाही तर आरोग्यासाठी देखील नुकसानकारक ठरू शकते. तसेच रात्री उशीरा जेवण केल्याने अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे रात्रीचे जेवण वेळेत करणे फार महत्वाचे आहे. रात्री वेळेवर जेवणाचे मुख्य 5 फायदे आहेत. हे फायदे कोणते आहेत याचा आपण आढावा घेणार आहोत…

1) शांत झोप लागतेः
वेळेत जेवण म्हणजे काय तर 7 च्या आधी जेवण करावे. असे केल्याने शांत झोप लागते. केवळ आपल्या शरीरासाठीच नव्हे तर उत्तम मानसिक स्वास्थ्यासाठी रात्रीची पुरेशी झोप आवश्यक आहे. वेळेवर जेवण केल्याने त्याचे पचनही वेळेत होण्यास मदत होते.

2) पचनशक्ती वाढतेः
रात्री जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे अन्न पचन करायला वेळच मिळत नाही. त्यामुळे पोटाचे विकार, पचनासंबधीचे विकार उद्भवत असतात. हे टाळायचे असेल तर वेळेत जेवणे करणे आवश्यक आहे.

3) वजन कमी होणे
रात्री वेळेत जेवल्याने शरीरातील अन्न व्यवस्थित पचते. पचलेले अन्नामुळे विविध मार्गांने तुमच्या शरिरातील इतर अवयवांना एनर्जी मिळते. तसेच यामुळे शरीरातील मेटाबॉलिजम वाढण्यास मदत होते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते.

4) हृदयाचे स्वास्थ्य सुधारते
वेळेत जेवणे केल्याने आपल्या हृदयाच्या स्वास्थ चांगले राहते. यामुळे तुमच्या शरीरातील कॅलरी बर्न होण्यास पचनसंस्थेला पुरेसा वेळ मिळतो. तसेच शरीरासाठी अपायकारक फॅटी अ‍ॅसिड्सही तयार होत नाहीत. याच फॅटी अ‍ॅसिड्समुळे हृदयरोगाचा झटका येण्याची शक्यता बळावते. त्यामुळे हे सर्व नियंत्रित ठेवण्याचे कार्य रात्रीच्या वेळी वेळेत जेवल्याने होते.

5) मधुमेहाचा धोका कमी
मधुमेह नियंत्रित राखण्यासाठी रात्रीचे जेवण वेळेत करणे गरजेचे आहे. रात्रीची जेवणाची वेळ पाळल्याने अन्न पचनप्रक्रियेत तयार होणारे अतिरिक्त ग्लुकोज तयार होत नाही. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी वेळेत जेवण करणे गरजेचे आहे.