कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करा : अर्थमंत्री निर्मला सीतारामन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करा त्याऐवजी ई-नाम (इलेक्ट्रॅानिक नॅशनल ऍग्रीकल्चर मार्केट) या व्यवहार पद्धतीचा वापर करावा, असे आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. दिल्लीमध्ये राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेतर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

बाजार समित्यांविषयी बोलताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, ‘बाजार समित्यांची कार्यपद्धती आणि कामकाज शेतकऱ्यांच्या शेतीमालाकरिता वाजवी दर देण्यात असमर्थ ठरत आहे. या बाजार समित्या बरखास्त करण्याबाबत आम्ही सर्व राज्य सरकारांसमवेत बोलत आहोत. आम्हाला याकरिता ऑनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) अधिक प्रभावीपणे राबवायचे आहे. ई-नाम ही इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग पोर्टल सुविधा आहे. त्याला सध्याच्या बाजार समित्याही जोडलेल्या आहेत. राज्यांनी या यंत्रणेऐवजी ई-नाम या व्यवहार पद्धतीकडे अधिक गतीने वळायला हवे. ‘

ई-नाम हे एक व्यापार पोर्टल www.enam.gov.in निर्माण करण्यात आले आहे. याद्वारे देशातील बाजार समित्या व त्यांचे व्यवहार इंटरनेटद्वारे राष्ट्रीय बाजारपेठेशी जोडण्यात आलेले आहे. देशातील जवळपास 7500 कृषी बाजार समिती ई-नामला जोडण्याची मोदी सरकारची योजना आहे. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट यासारखा ऑनलाईन प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांना मिळणार आहे. अशीही माहिती सीतारामन यांनी दिली.

हा शेतकऱ्यांच्या गळ्यात फास घालून आवळण्याचा प्रकार-

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बाजार समित्या बरखास्त करण्यासंबंधी केलेल्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनयंज मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. हा शेतकऱ्यांच्या गळ्यात फास घालून आवळण्याचा प्रकार असून, असं जुलमी सरकार नकोच अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे.

 

Visit : Policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like