तुम्ही कधी लाल भेंडी पाहिली आहे का ?, ‘या’ आजारांवर रामबाण उपाय, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आजपर्यंत तुम्ही हिरवी भेंडी पाहिली आहे. परंतू तुम्ही कधी लाल भेंडी पाहिली आहे का ? लाल भेंडीची चव ना की फक्त हिरव्या भेंडी सारखी आहे तर आरोग्यासाठी ही भेंडी अत्यंत गुणकारी आहे. यामुुळे अनेक आजार दूर होतात. ही लाल भेंडी वाराणसीच्या ‘भारतीय भाजी संशोधन संस्थे’ने 8 वर्ष मेहनतीनंतर तयार केली आहे.

या भेंडीचे नाव ‘काशी लालिमा’ ठेवण्यात आले आहे. 8 – 10 वर्षांच्या मेहनतीनंतर या संशोधनात यश आले आहे. अशा लाल प्रकाराची भेंडी एकेकाळी पाहिली जात होती. वैज्ञानिकांनी यावर अनेक प्रयोग करुन या प्रजातीच्या भेंडीला आणखी विकासित केले. या भेंडीमध्ये साध्या भेंडीपेक्षा एंथोसाइनिनचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे ती लाल दिसते.

या भेंडीमध्ये जास्त प्रमाणात आयन, कॅल्शिअम आणि जिंक आहे. साध्या भेंडीपेक्षा यातील पोषक तत्वे जास्त आहेत. याची शेती करणे देखील सोपे आहे. वैज्ञानिकांनी ही भेंडी शिजवून खाण्यापेक्षा सालेड म्हणून खाण्याचा सल्ला दिला आहे.
संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या भेंडीचे उत्पादन घेऊन शेतकरी दुप्पट फायदा कमाऊ शकतात. याची लावणी सामान्य भेंडीसारखीच केली जाते.

संस्थेने सांगितले की ही भेंडी अत्यंत चमत्कारिक आहे. विशेषता गर्भवती महिलांनी शरीरातील फॉलिक अम्लच्या कमीमुळे बाळाचा मानसिक विकास होत नाही, हे अम्ल काशी लालिमा भेंडीत आहे. एवढेच नाही तर यामुळे हद्य संबंधित आजार, जाडी वाढणे, डायबेटिस हे नियंत्रणात राहते.
वैज्ञानिक आता या भेंडीचे उत्पन्न कसे वाढवता येईल यावर भर देत आहेत.

संस्थेच्या निर्देशकांनी सांगितले की संस्थेआधी छत्तीसगढमध्ये काही भागात काही विद्यार्थी ही लाल भेंडी उगवत होते, परंतू वाराणसी भारतीय संशोधन संस्थेने यावर संशोधन करुन उगवले. याआधी अमेरिकेच्या क्लीमसन विवि यांनी लाल भेंडी उगवली होती.