‘मोदीजी आणि मोटाभाईला ‘चंगू-मांगू’ म्हणून त्यांचे उपकार विसरलीस?’ नेटकऱ्यांनी उडवली कंगनाची खिल्ली

पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या तिखट वक्तव्यांमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असणारी अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा नेटकऱ्यांची नाराजी स्वतःच्या अंगावर ओढून घेतली आहे. महाराष्ट्र सरकारवर नुकत्याच केलेल्या टीकेनंतर कंगनाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकार विरोधातल्या ट्विटमध्ये कंगनाने ‘चंगू मंगू गँग’ असा उल्लेख केल्याने नेटकऱ्यांचा संताप अजून वाढला आणि काही नेटकऱ्यांनी तिची खिल्ली देखील उडवली.

महाराष्ट्रात करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्यसरकारने अनेक ठिकाणी रात्रीची कर्फ्यू लावले असून अनेक निर्बंध जनतेवर लादले आहेत. यावर ट्विट करत कंगना म्हणाली, ” कुणी मला सांगू शकेल का कि महाराष्ट्रात लॉकडाउन आहे? सेमी लॉकडाउन? दिखावा किंवा बनावटी लॉकडाउन आहे? काय सुरुय इथं? हे बघून असं वाटतं कि कुणी कठोर निर्णय घेऊ इच्छित नाही. डोक्यावर टांगती तलवार असताना चंगू मंगू गँग, ते राहतील की नाही या त्यांच्या अस्तित्वाची लढाई लढत बसले आहेत.”

यामुळे महाराष्ट्राच्या सरकारवर निशाणा साधणाऱ्य़ा कंगनाला मात्र या ट्विटमुळे ट्रोल व्हावं लागलं आहे. एका नेटकाऱ्याने तर असे म्हंटले की “तू चंगू मंगू गँग” हा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासाठी तर वापरला नाहीस ना? त्यांचे उपकार विसरलीस”

तर एका ट्विटर युजरने कंगनाच्या या लेखावर असे म्हंटले कि, ” महाराष्ट्राचं माहित नाही पण कंगनाच्या बुद्धीला लॉकडाउन लागलंय.”