रिंकू राजगुरूच्या नव्या चित्रपटाचा ‘ढिनच्यॅक’ टीझर लॉन्च ; म्हणतेय तुमच्या नानाची…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सैराट मधील आर्चीच्या बिनधास्त भूमिकेमुळे नावलौकिक मिळवलेल्या  रिंकू राजगुरूच्या  ‘ कागर ‘ चित्रपटानंतर आता आणखी एका चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे. ‘मेकअप’ नावाच्या नव्या सिनेमामधून रिंकू राजगुरु प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

काय आहे टिझर ?

या टीझरमध्ये एका उंच इमारतीतल्या घरात उभी राहून रिंकू राजगुरू दारू पिऊन बडबडताना दिसते आहे. मात्र तिच्या भाषेचा ग्रामीण बाज या चित्रपटातही कायम आहे. आता नव्या सिनेमाच्या टिझरमध्ये रिंकू  नशेत आहे असे दाखवण्यात आले आहे. तिच्या या टीझरमधील डायलॉग वरून ती ‘मेकअप ‘ विषयी बोलताना दिसत आहे. कोणत्या तरी कारणावरून रिंकू भलतीच वैतागलेली दिसत आहे.

‘शेमारू’ च्या मराठी फेसबुक पेजवर आणि यु ट्यूब चॅनलवर हा टिझर पोस्ट करण्यात आला आहे.  मेकअप हा सिनेमा गणेश पंडित यांनी दिग्दर्शित केला आहे. त्यांनीच या सिनेमाचं लेखनही केलं आहे. बाळकडू, हिचकी यासारख्या सिनेमाचे लेखनही गणेश पंडित यांनी केलं आहे. आता रिंकू राजगुरूचा नवा सिनेमा कसा असेल हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

तसेच शेमारूने ” शेमारूचं नवीन सरप्राइज.. नवीन मराठी सिनेमा ‘मेकअप’. आपल्या लाडक्या रिंकू राजगुरूच्या या नवीन सिनेमाचं टिझर आता लॉन्च झालंय शेमारूमराठीच्या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब चॅनेलवर. . नक्की पहा आणि शेअर करा”. असा संदेश लिहीत हा टिझर रिलीज केला आहे.

Loading...
You might also like