‘करिश्मा-करीना’चा ‘हे’ फोटो पाहिलात का तुम्ही ? झपाट्यानं होतोय सोशलवर ‘व्हायरल’

पोलिसनामा ऑनलाइन –सध्या देशात लॉकडाऊन असल्यानं सेलेब्स लोकांची सोशल मीडियावरील सक्रियता वाढली आहे. अनेक सेलेब्स आता जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहे. अनेक सेलेब्सचे जुने फोटो आतपर्यंत सोशलवर व्हायरल होताना दिसले आहेत. अशात बॉलिवूड स्टार करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांचाही एक जुना लहानपणीचा फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

अलीकडेच करीनाच्या फॅन पेजवरून एक फोटो समोर आला आहे. यात एका जुना फोटो जो लहानपणीचा आहे. यात करीना आणि करिश्मा यांचा मोठ्या झाल्यानतंरचा फोटोही आहे. खास बात अशी की, लहानपणीच्या फोटोत आणि मोठ्या झाल्यानंतरच्या दुसऱ्या फोटोत दोघी बहिणी सेम पोज देताना दिसत आहेत. चाहत्यांनाही हे फोटो खूप आवडले आहेत.

View this post on Instagram

#KGirlsHereToRockTillHeightsOfSuccess #kareenaKarishma #loloAndBebo

A post shared by Kareena_kapoor_khan (@kareena_kapoor_khan_forever) on

करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा अंग्रेजी मीडियम हा सिनेमा 13 मार्च 2020 रोजी रिलीज झाला आहे. कोरोनामुळं सध्या सारं काही ठप्प झालं आहे. त्यामुळं काही दिवसांनंतर हा सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे. याशिवाय ती तख्त सिनेमातही काम करताना दिसणार आहे. हा सिनेमा 2021 मध्ये रिलीज होणार आहे. करीनाकडे लाल सिंह चड्ढा हा सिनेमाही आहे.

करिश्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तिनं डिजिटल डेब्यू केला आहे. अल्ट बालाजीच्या मेंटलहुड या सीरिजमध्ये करिश्मानं काम केलं आहे. तिच्या कामाचंही खूप कौतुक होताना दिसलं.