हवेलीत ‘कोरोना’चा कहर ! 142 नवे पॉझिटिव्ह

थेऊर, पोलीसनामा ऑनलाईन – हवेली तालुक्यात आज कोरोना रुग्णांचा उच्चांकी आकडा समोर आला असून एकाच दिवसात 142 रुग्णाची भर पडली आहे यात उरुळी कांचन येथे तब्बल 22 रुग्ण आढळले यामुळे एकुण रुग्ण संख्या 4321 वर पोहोचली असून यातील 3411 रुग्ण बरे झाले आहेत आणि यापैकी 831 एक्टीव रुग्ण असल्याची माहिती पंचायत समिती कडून मिळाली आहे.

हवेली तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत असून आज एकाच दिवशी आजपर्यंतचा सर्वात मोठा आकडा बाहेर आला आहे. यात उरुळी कांचन येथे आतापर्यंतचा मोठा आकडा बाहेर आला आहे यामुळे भितीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे यामध्ये कोणाची भूमिका कमी पडते यावर विचार करण्याची वेळ आली आहे. आजच्या आकडेवारी नुसार पूर्व हवेलीतील आळंदी म्हातोबा 2, कुंजीरवाडी 5, सोरतापवाडी 3, कदमवाकवस्ती 11, उरुळी कांचन 22, वाघोली 14, मांजरी बुद्रुक 15, तर हांडेवाडी 5, कोंढवे धावडे 16 या गावची परिस्थिती आहे.