हवेलीची ‘अस्मिता’ होतेय ‘जागृत’, आमदार आमचाच हवा !

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन ( शरद पुजारी ) – हवेली तालुक्यातील तरुण कार्यकर्त्यांनी हवेलीची अस्मिता जागृत करुन तालुक्यातील मतदारांना भावनीक आवाहन केले तर प्रस्तापितांना धक्का देण्या इतपत ताकद निर्माण होऊ शकेल त्यामुळे शिरुर हवेली विधानसभा मतदार संघात भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी याकडे गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे.

पूर्व हवेलीला आजपर्यंत केवळ वरिष्ठांनी मतदानासाठी वापरुन घेतले. केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत संधी दिली.परंतु विधानसभेसाठी विचार केला नाही.आपल्यातील एखादा लोकप्रतिनिधी विधानसभेत असला पाहिजे असा सूर निवडणूका जशा जवळ येऊ लागल्या तसा उमटत आहे.

पूर्व हवेलीतून महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांच्या नावावर सहमती होऊ शकते कारण त्यांची येथील तरुणांमध्ये जवळीकता तसेच सर्वसामान्यांत मिसळणारा कार्यकर्ता अशी ओळख आहे. हवेलीचा आत्मा असलेला यशवंत सहकरी साखर कारखाना सन 2011 मध्ये बंद पडला यावर काही तोडगा निघून लवकर चालू होईल असे सभासदांना वाटले. सन 2014 च्या लोकसभा व नंतर विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा चर्चेत होता. परंतु आश्वासनापलिकडे काहीच मिळाले नाही.

केंद्रात अवजड उद्योग खाते सेनेकडे असूनही माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना मार्ग काढता आला नाही परिणामी यावेळीच्या लोकसभा निवडणुकीत हवेलीत याचे परिणाम दिसून आले. यावरुन कारखाना चालू करण्या संबंधात प्रस्थापितांनी आश्वासनाचे गाजर दाखवत मतदारांची फसवणूक केली असा माणस तयार झाला आहे म्हणून यावेळी आपलाच आमदार विधानसभेत पाठवून आपला प्रश्न सोडवला पाहिजे असे बोलले जाते या कारखान्याचे सुमारे वीस हजार सभासद व कामगार आजही कारखाना चालू होईल या आशेवर आहे.

 

visit: Policenama.com

You might also like