Coronavirus : हवेली तालुक्यातील बाधितांचा आकडा 448 वर

थेऊर  : पोलीसनामा ऑनलाइन (शरद पुजारी) –  हवेली तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 500 च्या घरात पोहोचला असून यातील 221 रुग्ण बरे होऊन घरी परतले तर 270 रुग्ण वेगवेगळ्या हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. आज मिळालेल्या माहितीनुसार 50 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
हवेली तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. सचिन खरात यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार हवेली तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णाची संख्या 448 वर पोहोचली आहे.यामध्ये आजच्या कोरोना बाधीताच्या आकडेवारी नुसार पूर्व हवेलीतील मांजरी बुद्रुक येथील 16 लोणी काळभोर मध्ये 4 तर उरुळी कांचन येथे 2 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

कोरोनाचा कहर हवेली तालुक्यात दिसून येत आहे संक्रमणाची साखळी तोडण्यात आतापर्यंत यश आले नाही दररोज रुग्णाची संख्या वाढत आहे यावर स्थानिक आमदार अशोक पवार तसेच शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनीही याबद्दल काही मार्गदर्शक सूचना दिल्याची माहिती मिळते आहे.

लाॅकडाऊन उठल्यानंतर जनजीवन सुरळीत सुरु झाले परंतु नागरिकांनी नियमाकडे दुर्लक्ष केल्यामुळे कोरोना पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिरला.गेल्या पंधरा दिवसांत ही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यावर अधिकारी स्तरावर अनेक बैठका झाल्या वेगवेगळ्या उपाययोजना करण्या संदर्भात सूचना दिल्या परंतु याचे परिणाम मिळताना दिसत नाहीत.

पूर्व हवेलीतील गावामध्ये वेगवेगळ्या दिवशी लाॅकडाऊन केले जाते त्यामुळे सोशल डिस्टंशिंग राखण्यात अडचणी येत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like