हवेली तालुक्यातील युवक काँग्रेसच्या अध्यक्षाचा काँग्रेस पक्षाला ‘रामराम’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हवेली तालुक्यात काँग्रेस पक्षाला जबरदस्त धक्का बसला. भेकराईनगर येथील युवक काँग्रेसचे अध्यक्ष पहिलवान विठ्ठल कामथे यांनी आज आपल्या शेकडो सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप आबा यादव, हवेलीचे तालुकाप्रमुख संदिप मोडक, विभागप्रमुख सुभाष गायकवाड यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. गंगानगर येथील उद्योगपती मयूर कसबे, गणेशनगर येथील नवनाथ हरपळे, वडकी येथील मयूर शिर्के यांनी देखील आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आहे.

विठ्ठल कामथे हे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष संजय जगताप यांचे निकटवर्तीय मानले जात. त्यांच्यासमवेत निलेश आलेगावकर, पप्पू आलेगावकर, वैभव भोसले, आकाश बिरादार, राजरत्न यादव, अकिब शेख, नागेश बनसोडे, प्रविण सुरवसे, शुभम पाटील, अक्षय दाताळ, संतोष बाप्पू मोरे, ऋषिकेश जाधव, धनराज जाधव, प्रथमेश सावंत, आशुतोष पवार, पोपट काटकर, विनायक शितोळे, लक्ष्मिकांत दासरी, मधुमंगेश पाटील, निखील पाटील, ऋषिकेश कामथे, प्रविण जाधव, दिलीप जगताप, शुभम शिंदे, हनुमंत पांढरे, प्रशांत जाधव, सुरेश मेटे, विक्रम माळवदकर व शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे कॉंग्रेस हवेलीत खिळखिळी झाल्याचे चित्र आहे.

यावेळी बोलताना कामथे म्हणाले, कॉंग्रेस पक्ष हा विकासाच्या दिशेने वाटचाल करत नसून विकासात अडथळे निर्माण करणारा पक्ष बनला आहे. पुरंदर हवेलीत सुद्धा ज्या पद्धतीने पक्षाच्या नेत्यांनी गुंजवणीसारखा प्रकल्प होऊ नये म्हणून प्रयत्न केले ते निंदनीय आहेत. हवेलीत सुद्धा अशीच स्थिती असून शिवतारे यांच्या माध्यमातून झालेल्या प्रचंड विकासामुळे प्रभावित होऊन आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी हवेलीतून शिवतारे यांना प्रचंड लीड मिळणार असून विरोधकांचे पानिपत निश्चित आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

Visit : policenama.com