शरीराचा विकास होताना होतात ‘हे’ 5 बदल, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – किशोरावस्था तो काळ आहे, जेव्हा मनुष्य आपले बालपण सोडून तारूण्याच्या उंबरठ्याच्या दिशेने पाऊले टाकतो. याकाळात मुलगा आणि मुलींमध्ये तरूण आणि तरूणी बनण्याची प्रक्रिया सुरू होते. ही 10 ते 19 वर्षाची आवस्था आहे. यादरम्यान सर्व बदल होतात. हे परिवर्तन मेंदूतील पिट्यूटरी ग्लेंडच्या स्त्रावामुळे होते. जे हार्मोन्सच्या बदलांमुळे होते. याच हार्मोन्समुळे किशोरावस्थेतील शारीरीक, भावनात्मक आणि सामाजिक बदल होतात.

 

बालकाच्या संपूर्ण शारीरीक आकारातील बदल हे शारीरीक वाढीचे महत्वपूर्ण लक्षण आहे. बालपणातील हे परिवर्तन तीव्र गतीने होते.

1. एक वर्षाच्या वयाच्या बालकाची उंचीत 50% ची वाढ होते, तर दुसर्‍या वर्षी 75% वाढ होते. याप्रकारे वजनातही वाढ होते. म्हणजेच 5 व्या महिन्यात दुप्पट, 1 वर्षात तीनपट आणि नंतरच्या दोन वर्षांपर्यंत चारपट वाढ होते.

2. तरूण होत असलेल्या मुलांमध्ये वेगाने हार्मोन्सचे बदल होतात. यामुळे भावना बदलतात. यामुळेच मुलांना तारूण्याची जाणीव होते. जर या दरम्यान मुलांमध्ये होर्मोन्सचे नियंत्रण योग्य प्रकारे झाले नाही तर वाढीवर परिणाम होतो.

3. हार्मोन्सच असे कारक आहेत ज्यामुळे मुलांना आपल्या आतमध्ये होत असलेले बदल अनुभवत असतात.

4. किशोरावस्थेत मुलांची उंची जवळपास 25 टक्केपर्यंत वाढते. शरीराचा विकास होण्याबरोबच शरीरात उंचीमध्ये अचानक बदल दिसून लागतात. आणि त्यांची उंची वेगाने वाढू लागते.

5. बघता-बघता किशोरावस्थेत मुलाची उंची वाढत जाते. हे हार्मोन्समधील बदलांमुळे होते, कारण या दरम्यन सर्वात जास्त हार्मोन्समध्ये परिवर्तन होते.

You might also like