‘संबंध’ न ठेवल्यानं लवकर होते ‘मेनोपॉज’ची समस्या, शोधातून खुलासा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ज्या महिला जास्त प्रमाणात शरीरसंबंध ठेवतात त्यांच्यामध्ये पीरियड्स बंद होण्याची शक्यता कमी असते. महिन्यात एकदा संबंध ठेवणाऱ्या महिलांच्या तुलनेत आठवड्यातून एकदा संबंध ठेवणाऱ्या महिलांमध्ये मेनोपॉजची शक्यता 28 टक्के कमी असते. शोधातून याची माहिती मिळाली आहे. संशोधकांनी सांगितलं आहे की, लैंगिक संबंधांची चिन्हे शरीरावर असे सूचित करतात की, गर्भवती होण्याची शक्यता आहे.

ज्या महिला मिडलाईफ म्हणजेच 35 किंवा त्याहून अधिक वयाच्या असतात आणि त्या जास्त प्रमाणात संभोग करत नाहीत त्यांच्यात लवकर मेनोपॉज दिसून येते. लंडनच्या एका विद्यापीठातील मेगन अर्नोट म्हणतात, “जर एखादी महिला संबंध ठेवत नसेल आणि गर्भधारणेसाठी काही संधीच नसेल तर शरीर ओव्युलेशन म्हणजेच अंडोत्सर्ग बंद करतं. कारण हे व्यर्थ जाईल.

2936 महिलांवर हा अभ्यास करण्यात आला होता. अभ्यासातून असंही समोर आलं आहे की, ओव्युलेशन दरम्यान महिलेची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. लैगिंक संबंधांबद्दल महिलांना प्रश्न विचारला असता त्यांनी साप्ताहिक सक्रियता असल्याचं 64 टक्के महिलांनी सांगितलं. 10 वर्षांच्या पाठपुरावा कालावधीत असं दिसून आलं की, 2936 महिलांपैकी 1324 म्हणजेच 45 टक्के महिलांनी सरासरी 52 व्या वर्षी नैसर्गिक पीरियड्सचा अनुभव घेतला आहे.

मेनोपॉज म्हणजे ती अवस्था असते जेव्हा महिलांच्या मासिक पाळीचं चक्र बंद होतं. यालाच प्रजनन क्षमतेचा अंतही म्हटलं जातं. या शोधाचा रिपोर्ट जर्नल रॉयल सोसायटी ओपन सायंस नावाच्या पत्रिकेत प्रकाशित करण्यात आला आहे. या पत्रिकेत प्रकाशित रिपोर्टमध्ये यामागील कारणाचा उल्लेख केलेला नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like