IPL 2020 : मुंबईच्या खेळाडूंसोबत दिसला अर्जुन तेंडुलकर, चाहते म्हणाले- ‘हा तर नेपोटीजम !’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये नेपोटीजमचा मुद्दा जोरदार चर्चेत दिसला होता. क्रिकेटमध्ये देखील आता हा नेपोटीजम आला अशी टीका चाहते करत आहेत. भारत तसचे जागतिक क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्यामुळं ही चर्चा सुरू झाली आहे.

19 सप्टेंबरपासून UAE मध्ये IPL 2020 चा 13 वा हंगाम सुरू होत आहे. कोरोनामुळं ही स्पर्धा भारताच्या बाहेर होत आहे. मुंबई इंडियन्सनं या स्पर्धेत सर्वाधिक म्हणजे 4 विजेतेपदं मिळवली आहेत. आता मुंबई विक्रमी 5 वं विजेतेपद मिळवण्याच्या तयारीत आहे. मुंबईचे खेळाडू नेटमध्ये जोरदार तयारी करत आहेत. नेटमध्ये मुंबईच्या फलंदाजांना बॅटींगचा सराव देणाऱ्या गोलंदाजांमध्ये अर्जुन तेंडुलकरचाही समावेश आहे.

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसोबत अर्जुन तेंडुलकर दिसणं हे काही चाहत्यांना खटकलं आहे. अर्जुनचा या फोटोत सहभाग म्हणजे नेपोटीजम असल्याचं बोललं जात आहे. राहुल चाहरनं हा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना चाहर म्हणतो, “You’re only one swim away from a good mood.”

चाहरनं हा फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या फोटोचं कौतुक केलं तर काहींनी मात्र याला नेपोटीजम म्हटलं आहे.

अर्जुन तेंडुलकर हा मुंबईकडून स्थानिक क्रिकेट खेळतो. 19 वर्षांखालील मुंबई संघाचं त्यानं प्रतिनिधित्व केलं आहे. इतकंच नाही तर टीम इंडियाच्या ज्युनियर संघाकडूनही तो खेळला आहे. आयपीएलमधील सर्वच संघांना नेटमधील सरावासाठी गोलंदाजाची गरज असते. यासाठी युवा खेळाडूंची निवड केली जाते. यात अर्जन तेंडुलकरचा समावेश असणं यात चुकीचं असं काहीच नाही. आयपीएलशिवाय अर्जुननं अनेकदा भारताच्या महिला व पुरुष संघातील खेळाडूंना नेटमध्ये गोलंदाजी केली आहे. परंतु काही चाहत्यांनी मात्र याला नेपोटीजम म्हटलं आहे.