सेक्स शरीरासाठी आवश्यक ; पहा तज्ज्ञ काय सांगतात

पोलीसनामा ऑनलाईन टीम – शरीर संबंधातून मिळणारा आनंद हा मनाला सुखद अनुभव देतो. पण, याच शरीर सुखामुळे तुमची शरीर निरोगी राहते, असे कुणी सांगतले तर, खरे वाटेल का? पण, हे खरे आहे. शास्त्रज्ञांनी ते प्रयोगातून सिद्ध केले आहे. परंतु, काही जण निसर्गाच्या विरुद्ध जातात. त्याचे गंभीर परिणाम शरीरावर होऊ शकतात. काही तज्ज्ञ सांगतात, सेक्स न केल्यास नपुंसकत्व येण्याची किंवा कॅन्सर होण्याची शक्यता असते. तसेच खूप काळ सेक्स न केल्यास गंभीर आजार निर्माण होऊ शकतात.

द जर्नल बायोलॉजिकल सायकोलाजीच्या एका अहवालानुसार, जे व्यक्ती सेक्स करत नाहीत त्या तणावग्रस्त परिस्थिती राहतात. त्यांना सतत तणावाला तोंड द्यावे लागते. कारण सेक्स करते वेळेस चांगले हार्मोन निर्मिती होत असते. या हार्मोनमुळे तणावावर मात करण्यास मोठी मदत होते. सेक्स न केल्याचा आणखी गंभीर परिणाम म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. एका संशोधनानुसार जे लोक आठवड्यातून एकदा किंवा दोनदा सेक्स करतात, त्यांच्यात सेक्स न करणाऱ्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात रोगप्रतिकारक क्षमता असते.

अमेरिकन जर्नल ऑफ मेडिसिनच्या अहवालानुसार, जे पुरुष काही दिवस सेक्स करत नाहीत. त्यांच्यात आठवड्यातून एकदा सेक्स करणाऱ्यांच्या तुलनेत प्रणयासाठी तयार होण्यास अडथळा येतो. पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही खूप काळ सेक्स न केल्यास तणावग्रस्त वाटत असते. एका अभ्यासानुसार, वीर्यातील मेलाटोनिन, सेरोटोनिन आणि ऑक्सिटोसिन यासारख्या हार्मोन्समुळे स्त्रियांचा मूड सुधारण्यास मदत होते.

सर्वात गंभीर म्हणजे सेक्स न केल्याने शरीरावर काही वेगळे परिणाम होऊ शकतात. ते व्यक्तिपरत्वे वेगवेगळे असतात. जे पुरुष नियमित सेक्स करतात त्यांना सेक्स न करणाऱ्यांच्या तुलनेत प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी असल्याचे संशोधक सांगतात.

आरोग्य विषयक वृत्त –

ई-फार्मसीसाठी ई-प्रिस्क्रिप्शनची गरज

घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका

स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!

विद्यार्थ्यांचा शोध, आंब्याच्या पानांपासून तयार केले मद्य

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like