उद्यापासून दिल्लीतील हजरत निजामुद्दीन दर्गा होणार खुला !

पोलिसनामा ऑनलाईन – राजधानी दिल्लीतील हजरत निजामुद्दीन दर्गा उद्यापासून खुला होणार आहे. कोविड-19 लॉकडाउनमुळे दर्गा बंद ठेवण्यात आला होता. मात्र, आता जरी तो खुला होत असला तरी कोरोना आजारासंदर्भातील सर्व काळजी जाणार असून सोशल डिस्टंसिंगचे पालनही केले जाणार आहे.

हजरत निजामुद्दीन दर्ग्याचे प्रभारी सय्यद आदिब निझामी म्हणाले, दर्गा उद्यापासून खुला होत आहे. कोविड संदर्भात सरकारने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी सर्व प्रकारची तयारी केली आहे. सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार आम्ही दर्गा खुला करत आहोत. दिल्ली देशातील इतर शहरांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर संसर्ग झालेले शहर आहे. एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1.85 लाखवर पोहोचली. शहरात सध्या 18,842 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत, तर बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1.61 लाख आहे.