नांदेड डिमार्ट समोरील जय रेसिडेन्सी मध्ये घरफोडी; तीन लाखांचा ऐवज लंपास

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन 

नांदेड जिल्ह्यात चोरी चे प्रमाण वाढले असून भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या डिमार्ट समोरील जय रेसिडेन्सी मध्ये आज पहाटे घरफोडी झाली. यामध्ये जवळपास तीन लाख रुपयांचा ऐवज व रोख चोरट्यांनी लंपास केला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cbc893d1-cbe1-11e8-b700-25a04787ca9d’]

भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कॅनॉल रस्त्यावर भुरट्या चोऱ्या वाढल्या आहेत. त्यातच मंगळवारी पहाटे जय रेसिडेन्सी मध्ये श्री माचेवाड हे ३०३ नंबरच्या फ्लॅट मध्ये राहतात. माचेवाड हे सोमवारी आपल्या नातीच्या वाढदिवसासाठी औरंगाबाद येथे गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घर साफ केले. लोखंडी रॉड ने कुलूप तोडून चोरट्यांनी फ्लॅटमध्ये प्रवेश केला. कपाटाचे दार तोडून त्यामध्ये असलेले दागिने आणि ४० ते ५० हजार रुपयांची रोकड असा एकूण तीन लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे श्री माचेवाड यांनी सांगितले.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0a5cee97-cbe2-11e8-871a-4ba99449202e’]

या घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक डमाले यांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले होते. परंतु श्वानं मुख्य रस्त्यापर्यंत माग काढत गेले नंतर जागेवरच फिरू लागल्याने पोलिसांचे प्रयत्न निष्फळ गेले. सदरील प्रकरणाचा तपास पोलीस  उपनिरीक्षक ढेमकेवाड  डी बी इंचार्ज। यांची टीम करत आहेत.

भाजपा सरकारविरोधात उद्यापासून माकपचा ठिय्या