HC On Minor Girl Rape Case | ‘अल्पवयीन मुलीच्या संमतीने शरीरसंबंध हा बलात्कारच’ – उच्च न्यायालय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – HC On Minor Girl Rape Case | उत्तर प्रदेशात 16 वर्षांच्या मुलीवर तिच्या संमतीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तिने संमती दिली या सबबीवर जामीन मिळू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. अल्पवयीन व्यक्तीने दिलेली संमती (HC On Minor Girl Rape Case) ही कायद्याच्या दृष्टीने बचाव असू शकत नाही. शरीरसंबंध ठेवण्यासाठी अल्पवयीन मुलीने दिलेली संमती ही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरता येणार नाही, असेदेखील न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

 

अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी 2019 साली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत केली होती. यानंतर पोलीस तपासात ही मुलगी उत्तर प्रदेशमधील संबल तालुक्यामध्ये सापडली. त्यानंतर या मुलीला पोलिसांनी तिच्या कुटुंबाच्या ताब्यात दिले. जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवलेल्या जबाबामध्ये या मुलीने आपण आपल्या प्रियकराबरोबर होतो, अशी कबुली दिली. आपण दीड महिने प्रियकराबरोबर वास्तव्य केले असल्याचे या मुलीने सांगितले होते. यादरम्यान त्यांच्यात शरीरसंबंध झाले होते. माझ्या संमतीने आम्ही शरीरसंबंध ठेवले होते आणि भविष्यातही मला त्याच्याबरोबर राहायचे आहे, असे या मुलीने जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांना सांगितले होते. पण, या प्रकरणामध्ये मुलगी अल्पवयीन आहे आणि तिच्या आधारकार्डवरील जन्म तारखेतदेखील आरोपीने छेडछाड केली आहे. या मुलीच्या विवाहित प्रियकराला अटक करण्यात आली आहे. 2019 पासून आरोपी पोलीस कोठडीमध्ये आहे. त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, हा अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. (HC On Minor Girl Rape Case)

मुलीच्या आधारकार्डवरील जन्म तारखेत छेडछाड करून आरोपीने ती सज्ञान असल्याचे भासविले आहे.
त्यामुळे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याचे न्यायालयाने म्हणत आरोपीचा जामीन अर्जदेखील फेटाळण्यात आला आहे.
आरोपीवर बलात्काराच्या गुन्ह्याचा खटला सुरू आहे.

 

Web Title :- HC On Minor Girl Rape Case | ‘Intercourse with the consent of a minor girl is rape’ – Delhi High Court

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nashik ACB Trap | 51 हजारांची लाच स्वीकारताना ठेकेदार पोलिसांच्या जाळ्यात; नाशिकमधील प्रकार

U-19 Women’s T20 WC | शफाली वर्माची Under 19 विश्वचषकासाठी महिला संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती

Aurangabad ACB Tap | लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात