पुण्यातील अनधिकृत तीन मजली शाळेची इमारत पाडण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एका हौसिंग सोसायटीच्या मोकळ्या मैदानावर अतिक्रमण करत एका संस्थेन शाळेचे तीन मजली इमारत बांधली असून ही इमारत अनधिकृत असून ही इमारत पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालायाने दिले आहेत. वडगाव शेरी येथील ग्रेवाल को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या ओपन स्पेसच्या आरक्षित भूखंडावर सिद्धीविनायक शिक्षण संस्थेने बेकायदेशिर अतिक्रमण केले आहे. या भूखंडावर संस्थेने शाळेची तीन मजली इमारत उभी केली आहे. ही इमारत 31 मे 2020 पर्यंत पाडून भूखंड रिकामा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

याबाबत हकीकत अशी की, वडगांव शेरी येथील ग्रेवाल को – ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या ओपन स्पेसच्या आरक्षित भूखंडावर सिध्दीविनायक शिक्षण संस्थेने बेकायदेशिरपणे अतिक्रमण केले. याठीकाणी तीन मजली इमारत बांधून त्या ठिकाणी शिवराज विद्या मंदिर या शाळेचे कामकाज सुरु केले. यावर सोसायटीचे पदाधिकाऱ्यांनी हरकत घेऊनही तसेच अनेकदा पाठपुरावा करूनही या संस्थेने इमारतीचे अतिक्रमण काढून घेण्यास नकार दिला. त्यामुळे न्यायालयात दाद मागण्यात आली होती.

इमारतीचे बांधकाम बेकायदेशिर असल्याने 01 नोव्हेंबर 2014 रोजी पुणे महानगरपालीकेचे अधिकारी व कर्मचारी हे पोलीस संरक्षणात जेसीबी मशिन वगैरे फौजफाट्यासह कारवाईसाठी आलेले होते. त्यावेळी संस्थेच्या पदाधिकारी व पालकांच्या विरोधामुळे कारवाई करण्यात आली नाही. हौसिंग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने हौसिंग सोसायटीच्या बाजूने निकाल देत शाळेची इमारत पाडून भूखंड मोकळा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मुदत वाढवून मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्यासदेखील परवानगी नाकारण्यात आली असल्याची माहिती ग्रेवाल हौसिंग सोसायटीतील डॉ. स्वाती गायकवाड आणि कांत कडकोळ यांनी दिली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/