गावठाणमधील SRA च्या कामाला हायकोर्टाकडून स्थगिती

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – विकास आराखड्याचा मुंबईतील गावठाणांचा राज्य सरकारने थेट झोपडपट्टीत समावेश करून तिथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करण्याला विरोध करत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र त्या विरोधात गावठाणातील रहिवाशांनी याचिका दाखल केली आहे. त्यावर दखल घेत हायकोर्टाने एसआरए अंतर्गत जागा ताब्यात घेण्यास किंवा बांधकाम करण्यास चार आठवड्यांची स्थगिती दिली आहे. मुंबईतील १८९ गावठाणांपैकी ६३ गावठाणांचा समावेश एसआरए अंतर्गत करण्यात आला आहे.

गावठाणातील अनेक रहिवाशांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कोर्टासमोर आपली बाजु मांडत सांगितले की, गावठाण म्हणजे झोपडपट्टी नव्हे आणि या जागेवर हे लोक पूर्वापार राहत आहेत. त्यामुळे या योजनेमुळे गावठाणात राहणाऱ्या लोकांचे नुकसान होत असून शासन यांच्यासोबत दुजाभाव करत आहे.

शासनाने डीपी प्लॅनमध्ये गावठाणचा भाग स्वतंत्र दर्शवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावर कोर्टाने एसआरए अंतर्गत जागा ताब्यात घेण्यास किंवा त्यावर बांधकाम करण्यास तूर्तास स्थगिती दिली आहे.

You might also like