रतन टाटांवरील अब्रुनुकसानीचा खटला उच्च न्यायालयाकडून ‘रद्द’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टाटा सन्सचे माजी चेअरमन आणि ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. रतन टाटा आणि टाटा समुहाचे विद्यमान चेअरमन एन चंद्रशेखरन त्यांच्यासह ८ संचालकांविरुद्ध यांच्या विरोधात नसली वाडियांनी दाखल केलेला अब्रुनुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला होता.

नस्ली वाडिया यांना टाटा समूहाच्या संचालक मंडळातून काढून टाकण्यात आल्यानंतर वाडिया यांनी हा खटला दाखल केला होता. याप्रकरणी डिसेंबर २०१८ मध्ये स्थानिक न्यायालयाने टाटांना नोटिसा बजावल्या होत्या. त्याविरुद्ध टाटांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

रतन टाटा आणि इतरांनी २०१६ मध्ये आपल्याला अपमानजनक शब्द वापरले असल्याचा आरोप वाडिया यांनी केला होता. वाडिया यांनी सांगितले होते की, २४ ऑक्टोंबर २०१६ ला सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या चेअरमन पदावरुन हटविल्यानंतर आपल्याविषयी बदनामीकारक शब्दांचा वापर केला होता. आपल्यावर मिस्त्रीला मिळाल्याचा आरोप केला गेला होता.

वाडिया हे २०१६ मध्ये टाटा ग्रुपमधील इंडियन हॉटेल्स, टीसीएस, टाटा मोटर्स आणि टाटा स्टील सहीत अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर स्वतंत्र संचालक म्हणून सहभागी होते. या कंपन्यांच्या बैठकीत शेअरधारकांनी वाडिया यांच्या विरोधात मतदान करुन त्यांना संचालक मंडळावरुन काढून टाकले होते.

वाडियांच्या खटल्यात सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यात टाटा यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले की, वाडिया हे सायरस मिस्त्री यांचे समर्थक आहे. कॉर्पोरेट वादातून निराश झाल्याने त्यांनी हा अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. हा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने हा खटला रद्द केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –