डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : आरोपी डॉक्टरांची ‘कस्टडी’ क्राइम ब्रांचला देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने क्राइम ब्रांचकडे दिल्यानंतर आता उच्च न्यायालयाने या प्रकरणातील आरोपी डॉक्टरांची कस्टडी क्राइम ब्रांचला देण्यास नकार दिला आहे. सुरुवातीलाच या प्रकरणाचा योग्य अधिकाऱ्यांकडे तपास का दिला नाही. असा सवाल विचारत न्यायमुर्ती एस. शिंदे यांनी राज्य सरकारची मागणी फेटाळून लावली आहे.

डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येप्रकरणी डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा अहुजा, डॉ. अंकिता खंडेलवाल यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणाचा तपास क्राइम ब्रांचकडे देण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला होता. दरम्यान आऱोपींच्या जामीन अर्जावर सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

कारागृहात जाऊन करावी लागणार चौकशी

याप्रकरणातील आरोपी हे पेशाने डॉक्टर आहेत. याचे भान ठेवायला हवे. सुरुवातीलाच या प्रकरणाचा तपास योग्य अधिकाऱ्यांकडे का दिला नाही ? असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला आहे. न्यायालयाने सांगितले की, क्राइम ब्रांचला त्यांची चौकशी कारागृह कोठडीतच येऊन करावी लागणार आहे. शुक्रवार,शनीवार, आणि रविवार या तीन दिवशी त्यांना सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत चौकशी करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. तर गुरुवारी म्हणजे आज दुपारी २ ते सायंकाळी ६ पर्यंत त्यांना चौकशीसाठी ताब्यात देण्यात आले.

मुंबई क्राइम ब्रांचने याप्रकऱणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येप्रकऱणी पुढील तपासासाठी तीन्ही आरोपी डॉक्टरांची २ दिवसांची कोठडी हवी असल्याची मागणी करण्यात आली होती. आम्ही काहीच केले नाही एवढंच उत्तर त्यांच्याकडून मिळत असल्याने जेल कोठडीत योग्य प्रकारे त्यांची चौकशी करता येणार नाही असे क्राइम ब्रांचने म्हटले होते.

जेल कोठडीतच चौकशी करण्याची आरोपींची मागणी

आरोपींच्या वकिलांनी क्राइम ब्रांचच्या मागणीला विरोध केला आहे. तपासात पुर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत. परंतु कारागृह कोठडीतच दिवसभर चौकशी करावी अशी मागणी केली.

वर्णद्वेषी टिप्पणी नाही, परंतु भगौडी म्हटले होते

पायल तडवींवर आरोपी डॉक्टरांनी कधीही वर्णद्वेषी शेरेबाजी केली नाही. परंतु प्रसूतीगृहातील रुग्णाच्या रक्तदाबाची नोंद चुकीची केल्याबद्दल प्रसंगी तिला दम दिला होता. परंतु तिच्याकडून वारंवार तीच चूक होत होती. त्यावर ती ‘मी थकले आहे’. असंच म्हणत होती. त्यामुळे स्टाफच्या खासगी व्हाट्स अप ग्रुपवर तिला स्वत:ची जबाबदारी टाळल्याबद्दल ‘भगौडी’ असं म्हटलं होतं. असं आरोपींचे वकिल आभात पौंडा यांनी न्यायालयात सांगितले.

Loading...
You might also like