मुंबई हायकोर्टाचा मुंबई महापालिकेला दणका !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई महापालिकेने बॉलिवूडची ( Bollywood ) अभिनेत्री कंगना रणाैतच्या ( Kangana Ranaut) कार्यालयावर अनधिकृत बांधकाम म्हणून कारवाई केली होती. मात्र, आता मुंबई हायकोर्टाने ( Mumbai High Court ) मुंबई पालिकेची कारवाई अवैध असल्याचे म्हणत मुंबई महापालिकेला चांगलाच दणका दिला आहे. मुंबई पालिकेने आपल्या कार्यालयाच्या केलेल्या तोडफोडप्रकरणी कंगना रणाैतने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

आज कोर्टाने या याचिकेवर आपला निकाल देताना कंगना रणाैतच्या कार्यालयावर केलेली कारवाई अनधिकृत असल्याचे म्हटले आहे. ‘महापालिकेने कंगनाला दिलेली नोटीस अवैध आहे. त्यामुळे त्याविषयी महापालिकेला भरपाई करावी लागेल. कंगनाच्या विनंतीचा विचार करण्यासाठी नुकसानीचे मूल्यमापन नंतर केले जाईल आणि त्याविषयीनंतर निर्णय दिला जाईल’, असा निर्णय न्या. शाहरुख काथावाला व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाकडून देण्यात आला आहे.

मुंबई मनपाची कारवाई नागरिकांच्या हक्कांविरोधात आहे, असं मत न्यायाधीशांकडून नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे आता महापालिकेला कंगनाला भरपाई द्यावी लागणार आहे.

You might also like