देशातील चौथी सर्वात मोठी IT कंपनी यंदा 15000 विद्यार्थ्यांना देणार नोकरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थव्यवस्थेवर आर्थिक मंदीचे सावट असून देखील देशातील दिग्गज आयटी कंपनीने विद्यार्थ्यांना एक खुशखबर दिली आहे. एचसीएल टेक्नॉलजी कॉलेज कॅम्पसच्या माध्यमातून नवीन विद्यार्थ्यांची भरती करणार आहे. चालू वर्षांमध्ये कंपनीने कॉलेज कॅम्पस मधील 8,600 विद्यार्थ्यांना भरती केले होते.

कंपनीचे मुख्य ह्यूम रिसोर्स ऑफिसर अप्पाराव व्हि. व्हि. म्हणाले की, या आर्थिक वर्षात आम्ही व्यवस्थापन व तांत्रिक विभागात दाखल झालेल्या लोकांच्या वेतनात 15% – 20% वाढ केली आहे.

या पदवीधारकांना 15 ते 20 लाखांचे पॅकेज –
आय आय एम – अहमदाबाद, बँगलोर आणि कलकत्ता, आयएसबी, एक्सएलआरआय तसेच एसपी जैन येथील मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतलेल्यांना वर्षाला 20 ते 23 लाख रुपयांचे पॅकेज देतात. आयआयएम-कोझिकोड, इंदूर आणि लखनऊच्या मॅनेजमेंट पदवीधरकांना कंपनी वार्षिक 15 ते 18 लाख इतके पॅकेज देते. त्याचबरोबर, कंपनी इतर महाविद्यालयांच्या पदवीधरांना वर्षाकाठी साडेचार ते सात लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज देते.

IIT ग्रॅज्युएटला 12-15 लाख –
मॅनेजमेंट मध्ये पदवी घेतलेल्यांना ग्लोबल इंगेजमेंट मॅनेजर (GEM) ट्रेनिंग प्रोग्रॅम मधून जावे लागते. आप्पाराव यांनी सांगितले की, जीईएमला प्रशिक्षण देणाऱ्यांना मुळात विक्री आणि पूर्व विक्री विभागात ठेवले जाते, तर उर्वरित व्यवसाय ऍनालिस्ट म्हणून काम करतात. तांत्रिक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की आयआयटी पदवीधारकांना कंपनी दरवर्षी 12 ते 15 लाख इतके पॅकेज देते तर एनआयटीच्या विद्यार्थ्यांना 8 ते 12 लाख रुपये दिले जातात.

एचसीएल कडून बारावी पास विद्यार्थ्यांची देखील भरती केली जाते. त्यांना एक वर्षांचे प्रशिक्षण देखील दिले जाते. यामध्ये नऊ महिन्यांचे शिक्षण आणि तीन महिन्यांसाठी नोकरी दिली जाते.

फेसबुक पेज लाईक करा –