कामाची गोष्ट ! 2 दिवसात करा बँकेची महत्वाची कामे, 11 तास बंद असणार ‘ही’ सुविधा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आर्थिक बाबींशी संबंधित तुमची बँकेत काही महत्वाची कामे असतील तर येत्या दोन दिवसांमध्ये करून घ्या कारण 18 जानेवारीला बँकांमधील इंटरनेट सुविधा बंद राहणार आहे त्यामुळे अनेक आर्थिक व्यवहारांना अडथळा निर्माण होऊ शकतो.

देशातील सर्वात मोठी खासगी बँक HDFCने काही तांत्रिक कारणांसाठी 18 जानेवारी रोजी आपली इंटरनेट सुविधा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास 11 तास ही सुविधा बंद राहणार असल्यानं बँक आणि ATM वर ताण येण्याची शक्य़ता आहे. तसेच या कालावधीमध्ये ग्राहकांना इंटरनेटद्वारे देवाण घेवाण करता येणार नाही. तसेच मोबाईल संबंधित अनेक बँकिंग सेवांचा लाभ यावेळी घेता येणार नाही.

HDFC ने दिला अलर्ट
18 जानेवारी रोजी रात्री 1 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्य़ंत 11 तासांसाठी इंटरनेट सुविधांसह इतर सेवा बंद राहणार आहेत. अशा प्रकारचा अलर्ट एच डी एफ सी बँकेने आपल्या ग्राहकांना दिला आहे. त्यामुळे ग्राहकांनी यावेळी कोणतेही ऑनलाईन व्यवहार करणे टाळावे.

तुमची बँकेबाबतची माहिती कोणालाही देऊ नका किंवा एखादा अनोळखी फोन आल्यास बँके संदर्भातील कोणतीही माहिती त्यांच्यासोबत शेअर करू नका अशा प्रकारची माहिती एचडीएफसी बँकेने ट्विट करून दिली आहे.

मागच्या महिन्यात देखील आल्या होत्या तांत्रिक अडचणी
डिसेंबर महिन्यात बँकेची सुविधा दोन दिवसांसाठी ठप्प झाली होती त्यामुळे ग्राहकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे या वेळी आधीच बँकेने ग्राहकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 18 जानेवारीला देखील सेवा पूर्ववत होण्यासाठी वेळ लागू शकतो.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/