HDFC बँकेनं ग्राहकांना दिली मोठी भेट ! EMI, डिस्काऊंट, कॅशबॅकसह बर्‍याच नवीन ऑफर्स, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : एचडीएफसी बँकेने ग्राहकांसाठी ‘समर ट्रीट्स’ नावाची ऑफर लाँच केली आहे. याअंतर्गत डिस्काउंट, नो-कॉस्ट ईएमआय, नो डाउन पेमेंट, कॅशबॅक, रिवॉर्ड प्वॉइंट्ससह अनेक ऑफर आहेत. कंपनीच्या निवेदनानुसार देशातील लॉकडाऊन हळू हळू हटविल्यानंतर ग्राहकांच्या बदलत्या गरजेनुसार ऑफर दिल्या जात आहेत. या ऑफर्स बँकेचे कार्ड, ईएमआय, लोन आणि पेझॅप (Payzapp) वर उपलब्ध असतील.

कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे ग्राहकांच्या जीवनशैली आणि त्यांच्या मागण्यांमध्ये बदल झाल्याचे बँकेने निवेदनात म्हटले आहे. वर्क फ्रॉम होम आणि शैक्षणिक अभ्यास घरी बसूनच केला जात असल्याने फोन, टॅब्लेट, संगणक आणि संबंधित वस्तूंची मागणी वाढली आहे. यासह सुरक्षित डिजिटल पेमेंट आणि खासगी वाहतुकीची मागणीही वाढत आहे. या व्यतिरिक्त बरेच बदल होत आहेत. अशा परिस्थितीत इलेक्ट्रॉनिक उपकरणे, शैक्षणिक, करमणूक आणि फिटनेस सदस्यता आदींची मागणी वाढली आहे. त्याचप्रमाणे दुकाने आणि व्यवसाय उघडण्यास सुरवात झाली आहे, त्यांना बिझनेस फायनान्सची आवश्यकता आहे.

एचडीएफसी बँक देत आहे ही ऑफर

– आयफोन एसई (iPhone SE) लाँचवर एक्सक्लुसिव्ह डिस्काउंट.
– मोठ्या उपकरणांवर नो कॉस्ट ईएमआय आणि नो डाउन पेमेंटचा ऑप्शन.
– निवडक ब्रँडवर सूट आणि कॅशबॅक.
– क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन खर्च करण्यासाठी अतिरिक्त 50% अतिरिक्त रिवॉर्ड प्वॉइंट्स.
– बँकेच्या कार लोनवर पहिल्या तीन महिन्यांसाठी 70% पर्यंत कमी ईएमआयची ऑफर.
– बँकेच्या दुचाकी लोनवर तीन महिन्यांकरिता 50% पर्यंत कमी ईएमआयची ऑफर.
– वेतन मिळविणार्‍या कर्मचार्‍यांना ओव्हरड्राफ्ट सुविधा.
– स्वयंरोजगार ग्राहकांसाठी अनेक कस्टम मेड फायनान्स स्कीम.
– पर्सनल लोन, गोल्ड लोन, क्रेडिट कार्डवरील कर्ज, प्रॉपर्टीवर लोन, बिझनेस आणि होम लोनची ऑफर.
– डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा पेझॅपद्वारे ऑनलाइन खर्चावर अतिरिक्त रिवॉर्ड्स.