HDFC बँकेचे ग्राहक आता विना डेबिट कार्ड ATM वर करू शकतात पैशांचे ट्रांजेक्शन, जाणून घ्या कसे?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  एचडीएफसी बँकेचे (HDFC Bank) ग्राहक आता विना डेबिट कार्डसुद्धा एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) कोणत्याही एटीएममधून पैसे पाठवू शकतात. बँकेने सोशल मीडियाद्वारे ग्राहकांना माहिती देत म्हटले आहे की, त्यांचे ग्राहक आता विना कार्ड सुद्धा बँकेच्या कोणत्याही एटीएममधून व्यवहार करू शकतात. बँकेने दावा केला आहे की, ही सुविधा ग्राहकांना सुरक्षित आणि सोप्या पद्धतीने रोख रक्कम काढणे आणि व्यवहार करण्यात सक्षम बनवते.

असे करा ट्रांजेक्शन

ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहे त्यास एचडीएफसीच्या नेट बँकिंगमध्ये जोडावे लागेल.

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बेनेफिशयरीला एसएमएसद्वारे 4 डिजिटचा आणि 9 डिजिटचा ऑर्डर आयडी मिळेल.

याच्या स्टेपमध्ये बेनेफिशयरीला एचडीएफसी बँकेच्या एटीएम मशीनवर जाऊन ‘कार्डलेस कॅश’चा पर्याय निवडावा लागेल.

आता बेनिफिशयरीला एटीएम मशीनमध्ये आपला ओटीपी, मोबाईल नंबर आणि 9 डिजिटचा ऑर्डर आयडीशिवाय अमाऊंट एंटर करावी लागेल.

  यानंतर बेनिफिशयरीला सहजपणे विनाकार्ड एटीएम मशीनमधून रक्कम मिळेल.

रोख रक्कम काढणे 24 तास वैध

एटीएम मशीनमधून विना डेबिट कार्ड रोख रक्कम काढण्याचा कालावधी 24 तास वैध आहे. 24 तासाच्या आत रक्कम न काढल्यास रक्कम तुमच्या खात्यात जाईल. या अंतर्गत 100 रुपयांपासून कमाल 10,000 रुपये रोख काढू शकता. एका महिन्यात एकुण 25 हजार रुपयांपर्यंत रक्कम अशाप्रकारे काढता येईल. मात्र, अशा प्रत्येक व्यवहारावर 25 रुपये वसूल केले जातील.

 

Web Title : hdfc bank customers can withdraw cash without debit card to atm know how to process

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Anti Corruption | गुटका विक्रीला ‘अभय’ देण्यासाठी 40 हजारांची लाच; वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह हवालदार अटकेत, अ‍ॅन्टी करप्शनची कारवाई

Pune Metro | ‘तरीही तुम्ही आलाच’; उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यम प्रतिनिधींबाबत असे का म्हणाले वाचा सविस्तर

PM Kisan | आता ‘या’ शेतकर्‍यांवर कारवाईची तयारी, चुकीच्या पद्धतीने घेतला योजनेचा लाभ; परत करावी लागेल रक्कम