खुशखबर ! ‘या’ बँकेच्या कार्डवर मिळणार दरवर्षी 50 लिटर पेट्रोल-डिझेल ‘एकदम’ फ्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एचडीएफसी बँकेने इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) च्या संयुक्त विद्यमाने नवीन क्रेडिट कार्ड लाँच केले आहे. नॉन-मेट्रो आणि छोट्या महानगरांसाठी हे नवी कार्ड लाँच करण्यात आलं असून या कार्डाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या कार्डच नाव ‘इंडियन ऑयल HDFC बँक क्रेडिट कार्ड’ ठेवण्यात आले असून या कार्डच्या माध्यमातून ग्राहकांना इंधन खरेदीवर मोठा फायदा आणि रिवॉर्ड मिळू शकतात.

या कार्डची किंमत 500 रुपये –
इंडियन ऑयल HDFC बँक क्रेडिट कार्ड रुपे आणि व्हिसा प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल. या क्रेडिट कार्डची वार्षिक फी 500 रुपये आहे. जर कोणी कार्डद्वारे वार्षिक 50,000 रुपये खर्च केले तर ही वार्षिक फी माफ केली जाईल.

कार्डची वैशिष्ट्ये –
इंडियन ऑइल एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डाद्वारे 27000 हून अधिक IOCL आउटलेटवर ‘फ्यूल पॉईंट्स’ नावाचे रिवॉर्ड पॉइंट मिळवू शकते. याशिवाय किराणा, बिल भरणा, उपयोगिता, खरेदी इत्यादी इतर खर्चावरही फ्यूल पॉईंट्स मिळवता येतील . या पॉइंट्सद्वारे प्रतिवर्षी 50 लिटर इंधनासाठी पूर्तता केली जाऊ शकते. थोडक्यात या पॉईंट्सद्वारे तुम्ही दरवर्षी 50 लिटरपर्यंत इंधन घेऊ शकता.

कार्डसाठी अशा प्रकारे करा अर्ज –
इंडियन ऑइल एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी www.hdfcbank.com या साईटवर अप्लाय करा.

किंवा बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन अर्ज करा.

लहान शहरांमध्ये क्रेडिट कार्ड पोहोचण्यासाठी उपाययोजना –
एचडीएफसी बँकेचे बिझिनेस आणि मार्केटींग प्रमुख पराग राव म्हणाले की, डिजिटल पेमेंटला छोटी शहरे आणि गावांपर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. भारतात इंधनाचा वापर वाढत आहे आणि लहान शहरे आणि शहरे ही इंधनवाढीची प्रमुख केंद्रबिंदू आहेत. एचडीएफसी बँकेच्या 75 टक्क्यांहून अधिक शाखा नॉन-मेट्रो शहरांमध्ये आहेत. आम्ही ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि अपेक्षा लक्षात घेऊन खास डिझाइन केलेली उत्पादने त्यांना उपलब्ध करून देऊन त्यांना अधिक सक्षम बनवू इच्छित आहोत.

कॅशलेस व्यवहारांना चालना विशेष योजना –
या कार्डसंदर्भात IOCLचे कार्यकारी संचालक विज्ञान कुमार म्हणतात की कॅशलेस आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी IOCL पुढे आहे. कंपनीच्या 27000+ रिटेल आउटलेट्सपैकी 98% क्रेडिट / डेबिट कार्डद्वारे पेमेंट स्वीकारण्यास सक्षम आहेत. आमचा विश्वास आहे की एचडीएफसी बँकेबरोबरची युती देशात डिजिटल पेमेंट आणि कॅशलेस व्यवहारांना चालना देईल.

Visit : policenama.com