‘या’ बँकेनं केला ‘फेस्टिव ट्रीट्स’ लॉन्च, प्रत्येक तासाला मिळणार आयफोन 11 जिंकण्याची संधी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सणासुदीच्या दिवसांच्या पार्श्वभूमीवर एचडीएफसी बँकेने देशातील सर्वात मोठ्या फायनान्शियल सर्व्हिसेज धमाका फेस्टिव ट्रीट्स ची घोषणा केली आहे. यामध्ये ग्राहकांना विविध प्रकारच्या सेवांवर सूट मिळणार असून1000 पेक्षा अधिक ब्रॅण्डच्या खरेदीवर डिस्काउंट देखील मिळणार आहे. याचबरोबर बँकेचे खरेदी कार्ड आणि डेबिट कार्ड होल्डर ग्राहकांना प्रत्येक तासाला एक आयफोन -11जिंकण्याची देखील संधी मिळणार आहे. तसेच बंपर पुरस्कार म्हणून मर्सिडीज कार जिंकण्याची देखील संधी मिळणार आहे.

खरेदीवर 10% सूट
HDFC बँकेने रिलायन्स डिजिटल, सॅमसंग, एलजी, एप्पल, यात्रा, ओयो, लाइफस्टाइल, मिंत्रा, विजय सेल्स, हेमलीज, एचपी,बिग बॉस्केट यांसारख्या ब्रॅण्डच्या खरेदीवर तुम्हाला 10 टक्के सूट मिळणार आहे. तासाठी बँकेने 1000 हुन आधिक ब्रँड बरोबर करार केला आहे. तसेच विविध प्रकारची सूट आणि ऑफरचा देखील लाभ मिळणार आहे.

लोन प्रोसेसिंग फी नाही
सणासुदीच्या दिवसांत बँकेच्या या ऑफर्समध्ये लोन प्रोसेसिंग फिवर सूट मिळणार असून विविध प्रकारच्या शुल्कांमध्ये देखील सूट मिळणार आहे.

फेस्टिव ट्रीट्सचे फायदे
बँकेचे खरेदी कार्ड आणि डेबिट कार्ड होल्डर ग्राहकांना प्रत्येक तासाला एक आयफोन-11 जिंकण्याची देखील संधी मिळणार आहे. तसेच बंपर पुरस्कार म्हणून मर्सिडीज कार जिंकण्याची देखील संधी मिळणार आहे.या योजनेत तुम्ही आयफोन 11 देखील स्वस्तात खरेदी करू शकता. तसेच तुमच्या क्रेडिटकार्ड आणि डेबिट कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला विविध लाभ या उत्सवांच्या दिवसात मिळणार आहे.

 

Visit : Policenama.com