देशातील ‘या’ खासगी बँकेसोबत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, मार्चपर्यंत बँक मित्रांची संख्या वाढवून करणार 25000

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  ग्रामीण भागात प्रवेश वाढवण्याच्या प्रयत्नात खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी एचडीएफसी बँक या आर्थिक वर्षाच्या अखेर पर्यंत आपल्या बँक मित्रांची संख्या २५,००० वाढवण्याचा विचार करत आहे. बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. सध्या बँक मित्रांची संख्या ११,००० आहे.

एचडीएफसी बँकेच्या कंट्री हेड ऑफ गव्हर्नमेंट इंस्टिट्यूशनल बिझिनेस व स्टार्टअप्स स्मिता भगत म्हणाल्या, आम्ही नेहमी सर्व ग्राहकांना, अगदी देशातील दुर्गम भागात राहणाऱ्यांनाही उत्तम बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो. आमच्या याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आम्ही या आर्थिक वर्षाच्या अखेरीस बँक मित्रांची संख्या ११,००० वरून २५,००० करू.

त्या म्हणाल्या की, ग्राहकांना बँक मित्रांच्या माध्यमातून खाते उघडणे, मुदत ठेव, पेमेंट प्रॉडक्ट्स आणि लोन या सर्व बँकिंग सुविधा उपलब्ध होतील. त्यांनी म्हटले की, बँक आपले बँक मित्र नेटवर्क वाढवण्यासाठी सरकारच्या सामान्य सेवा केंद्रे (सीएससी) च्या वापरावरही बँक विचार करत आहे.

बँकेने २०१८ मध्ये भारत सरकारच्या सीएससी ई-गव्हर्नन्सशी हातमिळवणी केली, जेणेकरून देशातील दुर्गम भागांपर्यंत पोहोचू शकतील. त्या म्हणाल्या की, बँक सीएससीशी संबंधित ग्रामीण पातळीवरील उद्योजकांकडून बँक मित्रांची नेमणूक करते. या संधी अंतर्गत व्यवसाय प्रतिनिधी बिझिनेस फॅसिलिटेटर (बीएफ) म्हणूनही काम करतील, जे व्यापारी, तरुण, उद्योजक, शेतकरी आणि महिलांना बँकेकडून कर्ज सुविधा देईल.