‘या’ बँकेनं 15 दिवसात दुसऱ्यांदा केली ‘FD’ च्या ‘व्याज’दरात कपात, ‘ज्येष्ठ’ नागरिकांना मात्र मिळणार खास ‘गिफ्ट’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठ्या खासगी क्षेत्रातील बँकेने पुन्हा एकदा आपल्या FD च्या व्याजदरात कपात केली आहे. 15 दिवसांपूर्वीच नवे व्याजदर निश्चित करण्यात आले होते, परंतू आता पुन्हा एकदा बँकेने FD वरील व्याजदरात कपात केली आहे.

याआधी HDFC Bank ने 30 ऑगस्टला एफडीच्या दरात कपात केली होती. डिपॉजिटवर 3.50 टक्क्यांपासून 7 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आले आहे. ज्याची मॅच्युरिटी 7 दिवसांपासून 10 वर्षापर्यंत आहे. यंदा मात्र बँकेने 1 वर्षापेक्षा कमी कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या FD वर व्याजदरात बदल केले आहेत.

एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी हे आहेत व्याज दर –
7 ते 14 दिवसांसाठी – 3.50 %
15 ते 29 दिवसांसाठी – 4.25 %
30 ते 45 दिवसांसाठी – 5.15 %
6 महिनांपासून 9 महिन्यापर्यंत – 5.65 %
9 महिने ते 1 वर्ष – 6.35 %

एक वर्षांपासून 2 वर्षांसाठी काय आहेत व्याज दर –
बँकेने 30 अंकांनी कपात केल्यानंतर आता FD चे व्याजदर 6.60 टक्क्यांपर्यंत पोहचले आहेत. 1 वर्षपासून ते 2 वर्षापर्यंतच्या व्याजदरात बँकेने 20 अंकांची कपात केली आहे. ज्यामुळे दर 6.60 टक्क्यांच्या स्तरावर पोहचले आहेत.

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार भेट –
5 पासून 10 वर्षापर्यंतच्या कालावधीत मॅच्यूअर होणाऱ्या डिपॉजिटवर बँकेने व्याजदरात 10 अंकानी कपात केली आहे. परंतू आता कपातीनंतर व्याजदर 7 टक्के झाले आहेत. परंतू बँकेने वरिष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या व्याजदारात 50 अंकानी वाढ केली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याज मिळेल. ऑगस्ट महिन्यात लागोपाठ चौथांदा व्याजदरात कपातीनंतर एसबीआय, एक्सिस बँक, कोटक बँक, बँक ऑफ इंडियासह मोठ्या बँकांनी व्याजदरात कपात केली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like