HDFC Bank ने होळीच्या निमित्ताने दिली खूशखबर ! 30 जूनपर्यंत ‘या’ ग्राहकांना मिळणार 0.75 % जास्त व्याज

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक (HDFC Bank) ने ज्येष्ठ नागरिकांना एक चांगली बातमी दिली आहे. बँकेने पुन्हा एकदा विशेष मुदत ठेव योजनेची तारीख वाढविली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक विशेष एफडी योजना प्रदान करते. या योजनेत बँका ज्येष्ठ नागरिकांना जास्त दराने व्याज देतात. दरम्यान ही सुविधा बँकेने 18 मे 2020 रोजी कोरोना साथीच्या वेळी सुरू केली होती, आता ती 30 जून 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे, म्हणजे ग्राहकांना 30 जून पर्यंत वाढलेल्या व्याजाचा लाभ मिळेल.

एचडीएफसी बँक या ठेवींवर 75 बेसिस पॉईंट अधिक व्याज देते. एचडीएफसी बँकेच्या सीनियर सिटीझन केअर एफडी अंतर्गत ज्येष्ठ नागरिकाने पैसे जमा केल्यास एफडीला लागू असलेला व्याज दर 6.25 टक्के असेल. हे दर 13 नोव्हेंबर 2020 पासून लागू आहेत.

30 जूनपर्यंत तुम्हाला मिळेल लाभ
एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटनुसार, 18 मे ते 30 जून या कालावधीत विशेष ठेवींच्या ऑफर दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांना 0.25 टक्के (सध्याच्या 0.50 टक्के प्रिमियमपेक्षा जास्त) अतिरिक्त प्रीमियम देण्यात येईल. याअंतर्गत मुदत ठेवी 5 कोटीपेक्षा कमी 5 वर्षे एका
दिवसापासून 10 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

एचडीएफसी बँक 7 दिवस ते 29 दिवसांच्या ठेवींवर 2.50% व्याज आणि 30-90 दिवसांच्या मॅच्युरिटी ठेवींवर 3% व्याज देते. या व्यतिरिक्त 91 दिवस ते 6 महिन्यांच्या एफडीवर 3.5 टक्के व्याज दिले जाते आणि 6 महिने एका दिवस ते एका वर्षाच्या एफडीवर 4.4 टक्के व्याज दिले जाते. एफडी मॅच्युरिटीवर एका वर्षात बँक 4.9 टक्के व्याज देते. एका वर्ष ते दोन वर्षांच्या कालावधीत मुदत ठेवींना 4.9 टक्के व्याज मिळते. 2 वर्ष ते 3 वर्षाच्या मुदतीच्या एफडीला 5.15 टक्के, 3 वर्ष ते 5 वर्षांपर्यंत 5.30 टक्के व्याज मिळते. मॅच्युरिटीी कालावधीत 5 ते 10 वर्षे ठेवींवर 5.50 टक्के व्याज मिळेल. दरम्यान हे दर 13 नोव्हेंबरपासून लागू आहेत.