विचारपूर्वक कराल Credit-Card चा वापर तर होतील खुप फायदे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना काळात क्रेडिट कार्डचा वापर खुप वाढला आहे. मात्र, अनेक लोक क्रेडिट कार्डचा वापर बेजबाबदारपणे करतात, ज्यामुळे त्यांना पुढे जाऊन समस्यांना तोंड द्यावे लागते. अशाप्रकारच्या वापराने क्रेडिट स्कोअर सुद्धा खराब होतो, ज्यामुळे भविष्यात कोणत्याही प्रकारचे लोन मिळण्यास अडचणी येऊ शकतात. सोबतच एक मोठी रक्कम व्याज म्हणून चूकती करावी लागते, कारण यावर चक्रवाढ पद्धतीने व्याज वसूल केले जाते.

स्मार्ट पद्धतीने वापरले तर मिळतील अनेक फायदे

खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेने क्रेडिट कार्डचा स्मार्ट पद्धतीने वापर केल्याने अनेक फायदे होत असल्याचे म्हटले आहे. बँकेचे म्हणणे आहे की, जर लोकांनी क्रेडिट कार्डचा समजूतदारपणे वापर केला आणि बिल वेळेवर चूकते केले तर हा एक प्रकारचा फायद्याचा सौदा आहे. बँकेने म्हटले आहे, अनेक लोकांना अजूनही क्रेडिट कार्डचा स्मार्ट पद्धतीने वापर करण्याची माहिती नाही, ज्यामुळे त्यांचे नुकसान होत राहाते.

पेमेंट करण्यात होते सुविधा

तुम्ही एक कार्ड स्वॅप करता आणि पेमेंट होते. जास्त कॅश घेऊन जाण्याची गरज नसते. तुम्ही हवे असल्यास क्रेडिट कार्डला डिजिटल वॉलेटशी लिंक करू शकता. यासोबतच कोणत्याही प्रकारचा चेक घेऊन जाण्याची सुद्धा गरज भासत नाही.

बिनव्याजी मिळते क्रेडिट

क्रेडिट कार्ड खरेदी आणि पेमेंटच्यामध्ये एका ग्रेस पीरियडसोबत येते. हा 50 दिवसांपर्यंत असू शकतो. या 50 दिवसांसाठी बँक कोणतेही व्याज घेत नाही. याद्वारे तुम्ही मोठे सामान खरेदी करू शकता आणि बँकेला तुम्ही 50 दिवसांच्या आत बिल चुकवावे लागेल. लक्षात ठेवा, जर हे पेमेंट चूकले तर महागात पडू शकते.

क्रेडिट स्कोरमध्ये होऊ शकते वाढ

क्रेडिट कार्ड तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्ये वाढ करू शकते. सीबीलसारख्या संस्था लोकांना क्रेडिट स्कोअर देतात, जे या गोष्टींवर अवलंबून असते की, तुम्ही तुमच्या पेमेंटच्या बाबतीत किती अ‍ॅक्टिव्ह आहात. जर तुम्ही क्रेडिटचे बिल वेळेवर चुकवले तर यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोरमध्ये वाढ होते. एका चांगल्या क्रेडिट स्कोरचा अर्थ असा आहे की, तुम्ही भविष्यात सहजपणे लोन किंवा क्रेडिट कार्ड दोन्ही घेऊ शकता.

एक्स्ट्रा बेनिफिट

क्रेडिट कार्डचे काही एक्स्ट्रा बेनिफिटसुद्धा आहेत. समजा तुमच्याकडे एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड आहे, तर आकस्मिक निधन कव्हर आणि तुमच्या द्वारे खरेदी केलेल्या वस्तूंवर आग आणि चोरीच्या स्थितीत सेफ्टी मिळू शकते. अशावेळी कोणत्याही प्रीमियमशिवाय तुम्हाला विमा कव्हर मिळेल. तुम्हाला केवळ काही मिनिमम खर्च करावा लागेल.

वेळेवर जमा होते युटिलिटी बिल

तुम्ही प्रत्येक महिन्याला तुमचे फोन, वीज किंवा गॅस बिलसारखे रिकरिंग पेमेंट्स करता. हे बिल वेळेवर व्हावे, यासाठी आपल्या क्रेडिट कार्डला पेमेंटसाठी ऑटोमॅटिक सेट करू शकता. यामुळे तुमचे बिल पेमेंट विसरण्याची समस्या संपेल आणि पेनल्टी भरावी लागणार नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like