HDFC ने गृहकर्जावरील व्याजदरात केली कपात, जाणून घ्या किती स्वस्त झालं घर घेणं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘हाउसिंग डेव्हलप्मेंट फायनान्स कॉर्पोरेशन’ (HDFC) बँकेने आज (बुधवार) गृहकर्जावरील व्याजदरात कपात केली आहे. बँकेने बुधवारी स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले, की आपल्या रिटेल प्राईम लेंडिंग रेटमध्ये 5 बेसिस पॉईंटमध्ये कपात केली आहे. जे 4 मार्च, 2021 पासून लागू होणार आहे.

बँकेने गृहकर्जावरील व्याजदरात केलेल्या कपातीनंतर HDFC गृहकर्जाचा दर किमान 6.75 टक्क्यांवर गेला आहे. या बदलाचा फायदा सर्व HDFC रिटेल गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांना मिळणार आहे. तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कोटक महिंद्रा बँकेनेही यापूर्वी गृहकर्जावरील व्याजदरात कपात केली होती. या दोन्ही बँकेने लागू केली आहे. त्यानुसार, ही ऑफर काही कालावधीसाठी लागू असणार आहे. SBI ने त्यांचे गृहकर्ज आणखी स्वस्त केले आहे. बँकेने गृहकर्जाच्या दरात 0.70 टक्क्यांपर्यंत सूट दिली आहे.

दरम्यान, SBI गृहकर्जाच्या दरात 6.70 टक्क्यांनी सुरू असणार आहे. मात्र, ही ऑफर काही मर्यादित कालावधीसाठीच असणार आहे. या व्याजदराचा लाभ 31 मार्चपर्यंत घेता येणार असल्याचे सांगितले जात आहे.