ब्रोकरेज हाऊसने HDFC, सन फार्मा व Exide ला दिले Buy रेटिंग, सांगितली तिघांची टार्गेट प्राईस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – HDFC | शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार्‍या नवीन लोकांना असे वाटते की शेअर मार्केटमध्ये पैसे कमवणे सोपे नाही आणि हे बर्‍याच अंशी खरेही आहे. पण फंडामेंटल्स बघून चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर मार्केटमध्ये पैसे कमवणे काहीसे सोपे होऊ शकते. मोठे गुंतवणूकदार फंडामेंटल्समध्ये तिमाही निकाल आणि वर्ष-दर-वर्ष नेट प्रॉफिट अवश्य बघतात. (HDFC)

 

आता फंडामेंटल्स तपासणे हे प्रत्येक सामान्य गुंतवणूकदारांच्या आवाक्यात नसल्यामुळे काही कंपन्या म्हणा किंवा ब्रोकरेज हाऊसेस आहेत, जे वेळोवेळी वेगवेगळ्या कंपन्यांचे फंडामेंटल्स सांगत असतात. यासोबतच ते स्टॉकमध्ये गुंतवणुकीचा सल्लाही देतात आणि स्टॉकची टार्गेट प्राईस देखील सांगतात. मात्र, स्टॉक मार्केटमधील कोणत्याही स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, एखाद्या सर्टिफाईड अ‍ॅडव्हायजरचा सल्ला घेणे योग्य आहे.

 

मोतीलाल ओसवालने सुचवले हे स्टॉक
भारतातील मोतीलाल ओसवाल (Motilal Oswal) या मोठ्या ब्रोकरेज फर्मने सुचवलेले तीन स्टॉक्स जाणून घेवूयात. या फर्मने तिन्ही शेअरमध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे आणि त्यांची टार्गेट प्राईस देखील सांगितली आहे. या तीन शेअरमध्ये एचडीएफसी (HDFC), सन फार्मा (Sun Pharma) आणि एक्साइड (Exide) यांचा समावेश आहे.

 

मोतीलाल ओसवालने एचडीएफसीसाठी रु. 2,830 ची टार्गेट प्राईस दिली आहे. सोमवारी, NSE वर या हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनच्या स्टॉकमध्ये किंचित वाढ झाली. शेअर 0.25 टक्क्यांनी वाढून 2,383.75 वर बंद झाला. फर्मचे म्हणणे आहे की एचडीएफसी बँकेत विलीनीकरणानंतर, एकट्या तिच्यावर विचार करणे थोडे कठीण आहे, परंतु तिच्या तारण व्यवसायात स्थिर प्रगती पहायला मिळणार आहे, कारण व्यवस्थापन या दिशेने काम करत आहे.

सन फार्मासाठी रु. 1,100 चे टार्गेट
एचडीएफसी व्यतिरिक्त, फर्मने आणखी एक शेअर सांगितला आहे, ज्याचे नाव सन फार्मा (Sun Pharma) आहे.
सोमवारी एनएसईवर 2.60 टक्क्यांनी घसरून 918.70 रुपयांवर बंद झाला.
मोतीलाल ओसवालने यासाठी 1,100 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.
फर्मने म्हटले आहे की सन फार्माने आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीत चांगले परिणाम दाखवले आहेत.
कंपनी आपल्या विशेष पोर्टफोलिओचा विस्तार करत आहे. यासह ब्रँड जेनेरिक पोर्टफोलिओमध्ये फ्रँचायझी तयार करण्यासाठी सतत कार्यरत आहे.

 

वरील दोन शेअरव्यतिरिक्त, मोतीलाल ओसवालने एक्साईड इंडस्ट्रीजचा स्टॉक खरेदीचा सल्ला दिला आहे.
यासाठी कंपनीने 200 रुपयांचे टार्गेट दिला आहे.
सोमवारी, एक्साईड Exide चा स्टॉक NSE वर 0.19 टक्क्यांनी घसरून 158.20 वर बंद झाला.
हा शेअर अनेक दिवसांपासून सातत्याने घसरत आहे. TradingView च्या चार्टनुसार, 24 ऑगस्ट 2018 रोजी या शेअरने 304.70 रुपयांचा उच्चांक गाठला.
ब्रोकरेज हाऊसने म्हटले आहे की, ऑटोमोटिव्ह आणि इंडस्ट्रियल सेगमेंटमध्ये जबरदस्त रेव्ह्येन्यू ग्रोथमुळे कंपनीने 2023 च्या पहिल्या तिमाहीत चांगले निकाल दिले आहेत.

 

Web Title :- HDFC | motilal oswal gives buy ratings to hdfc sun pharma and exide know target price

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shahajibapu Patil | ‘ठाकरी भाषा फक्त शिवसेनाप्रमुखांनाच शोभते, कोणी पोराने ती वापरू नये’; शहाजीबापू पाटलांचा आदित्य ठाकरेंना टोला

 

CM Eknath Shinde | शिंदे-ठाकरे उद्या पुण्यात आमने-सामने, दोन्ही गटांच्या समर्थकांकडून जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

 

BJP PM Candidate 2024 | नरेंद्र मोदीच असणार भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार, जाणून घ्या अमित शाह यांनी काय म्हटले