अवघ्या ३५ हजारांसाठी एचडीएफसीच्या सिद्धार्थ संघवी यांची हत्या!

मुंबई | पोलीसनामा  ऑनलाइन 

अवघ्या ३५ हजारांसाठी एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी सरफराझ शेख (२०) याला पोलिसांनी अटक केली असून त्याने केवळ ३५ हजारांसाठी संघवी यांची हत्या केल्याचे कबुल केले आहे. कमला मिल येथून पाच सप्टेंबर रोजी गायब झालेल्या संघवी यांचा मृतदेह रविवारी कल्याण येथील हाजीमलंग येथे सापडला होता.

पोलिसांचा शोध सुरू असताना सिद्धार्थ संघवी यांची कार शुक्रवारी नवी मुंबई येथील ऐरोली सेक्टर ११ जवळ सापडली होती.

पेट्रोलच्या वाढत्या दरावरुन भाजपा ट्रोल

[amazon_link asins=’B01DDP7D6W,B0756RCTK2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4c8a1a34-b58f-11e8-ad4f-8fc0ef8471aa’]संघवी याच्या मोबाइलवरून नवी मुंबई पोलिसांनी आधी कार आणि नंतर सरफराझ शेख याला बेलापूर येथून ताब्यात घेतले. आरोपी शेख याने मीच पैशासाठी सिद्धार्थ याला मारल्याचे सांगितले, असा दावा मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेत केला. मूळचा उत्तर प्रदेशचा असलेला शेख चार वर्षांपूर्वी मुंबईत आला. आधी तीन वर्षे त्याने कमला मिल कंपाऊंडमध्ये मजुरी केली. त्यानंतर काही दिवस त्याने अ‍ॅप आधारीत टॅक्सी कंपनीत चालक म्हणून नोकरी केली.

[amazon_link asins=’B0756RCTK1,B01FM7GG58′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5289988c-b58f-11e8-8879-b9f57c76800b’]मात्र, कंपनीने कामावरून कमी केल्याने सध्या शेख बेरोजगार होता. त्याचे ३५ हजार रुपयांचे हप्ते थकले होते. त्यासाठीच त्याने संघवी यांची हत्या करण्याचे ठरवले, असे पोलिस उपायुक्त अभिनाश कुमार यांनी सांगितले.

…..तर पेट्रोल मिळेल ५५ रुपयांत नितीन गडकरी यांनी दाखविले स्वप्न

शेख यास न्यायालयात हजर केले असता, मला पैशांची अत्यंत निकड होती. परंतु, त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने लूट करण्याच्या उद्देशाने मी हा खून केला, असे त्याने न्यायालयात सांगितले. त्यानंतर न्यायाधीशांनी त्याची रवानगी १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत केली आहे.