डोळा फोडला, ओठ तोडल्यानंतर पत्नीचा गळा आवळून केला निर्घृण खून

बीड (सिरसाळा) : पोलीसनामा ऑनलाइन – डोळा फोडला, ओठ तोडले आणि त्यानंतर गळा आवळून पत्नीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सिरसाळा येथे घडली आहे. सिरसाळा येथील पेट्रोलपंपाच्या मागच्या वस्तीत सोमवारी हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती, सासू, दीर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पत्नीच्या नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केल्याने काही वेळ तणावाचे वातावरण होते.

नेहा सिराज पठाण (वय-26) असे मृत महिलेचे नाव आहे. तर सिराय आयुब पठाण याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिरास हा शेती व विटभट्टीवर मजुरी करतो. सोमवारी (दि.25) दुपारी तीनच्या सुमारास तो कामावरून घरी आला. त्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत त्याने नेहाचा एक ओठ तोडला. त्यानंतर तीक्ष्ण हत्याराने तिचा डावा डोळा फोडला. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्याने नेहाच्या गळ्यावर हत्याराने वार करून तिचा गळा आवळून खून केला.

पत्नी नेहाचा खून केल्यानंतर त्याने पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव केला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलिसांनी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घटनास्थळी धाव घतेली. घटनास्थळी पोहचल्यानंतर ही आत्महत्या नसून खून असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी संशयावरून पती सिराज याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवाडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

सिरसाळा पोलिसांनी मृत नेहाचा पती, दोन दीर व सासू यांना ताब्यात घेतले. घटनेची माहिती मिळताच नेहाच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. खुनाचे कारण अद्याप समजू शकले नाही. रात्री उशिरा सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Visit : Policenama.com