अरे बापरे ! चक्क त्याने PUBG गेम खेळून कमावले ७० कोटी

दिल्ली : वृत्तसंस्था – बऱ्याचदा मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर इंटरनेटच्या माध्यमातून गेम खेळणं फक्त शिल्लक वेळ घालवण्याचं एक साधन समजलं जातं. परंतु आता व्यवसायासाठीही या गेमचा वापर केला जातोय. अनेक जण PUBG गेम खेळून पैसे कमावत आहेत. यू ट्युबवर असे अनेक चॅनेल्स आहेत, ज्यावर पबजी गेम खेळला जातो आणि गेम खेळताना पाहून लोक समोरच्याला पैसे देतात.

गेम फक्त लोकं वेळ घालवण्यासाठी नाही खेळत तर आता यातून पैसे कमावण्याचं साधन म्हणून देखील पाहिलं जातं. नेटीझन्समध्ये लोकप्रिय असलेला PUBG या गेममधून देखील लोकं आता पैसे कमावत असल्याचं समोर आलं आहे.  PUBG हा गेम भारतात जरी जास्त लोकप्रिय नसला तरीही अमेरिकेत हा खेळ भरपूर खेळला जातो. PUBG सारखाच Fortnite हा खेळ देखील अमेरिकेत जास्त प्रमाणात खेळला जातो.

YouTube वर त्यांचे 21 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याची पूर्ण कमाई ही यू ट्युब आणि Twitch च्या भागीदारीतून होते. Twitch वर त्याला 12.5 मिलियन लोक फॉलो करतात. यात 40 हजार लोक गेम पाहण्यासाठी पैसे देतात. ज्यांनी सब्सक्रिप्शन मॉडल ठेवलं असून, ज्यात त्यांना 5, 10, आणि 20 डॉलर दर महिन्याला द्यावे लागतात. YouTube वर निंजा हा पॉप ऍडच्या माध्यमातून पैसे कमावतो. त्याची जास्त करून कमाई ही स्पॉन्सर्डनं होते. सॅमसंग, उबर ईट्स आणि रेड बुलसारख्या कंपन्याही यात सहभागी आहेत. निंजाच्या मते कॉफी शॉपसारखंच पैसे कमावण्याचं बिझनेस शॉप उघडलं पाहिजे.