बहिणीबद्दल अपशब्द वापरल्याने मारहाण करणाऱ्या भावाचा भोसकून खून

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन  – पलूस तालुक्यातील बुर्ली येथे बहिणीबद्दल अपशब्द वापरल्याने भावाने एकास मारहाण केली होती. या भांडणाचा रागातून गणेश शांताराम शिखरे (२२) याचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. या खूनप्रकरणी संशयित कुणाल चंद्रकांत शिखरे (२०, रा. बुर्ली) यास पोलिसांनी अटक केली आहे.

मागील महिन्यात संशयिताने गणेशच्या बहिणीस अपशब्द वापरल्याच्या कारणावरून दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली होती. त्यावेळी गणेशने कुणालला थोबाडीत मारली होती. त्याचा राग मनात धरून गुरुवारी रात्री गणेशवर त्याने चाकूने वार केल्याचा संशय आहे. गणेश हा येथील कै. राजाराम मदने दादा चौकात थांबला होता. त्याच वेळी कुणालने चाकूने वार केला. यात गणेश जबर जखमी होऊन मरण पावला.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या युवकावर गुन्हा
सातारा : अल्पवयीन मुलीला त्रास देवून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणाऱ्या कोयनानगर येथील युवकाविरूध्द कोयना पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहती अशी की, कोयनानगर येथील एका अल्पवयीन मुलीला अमर एस देसाई (४०) हा वेळोवेळी त्रास देत होता. कोयनानगर एस. टी. स्टॅण्डवर तिला थांबवून माझ्याबरोबर मैत्री कर, असे बोलून लज्जा उत्पन्न असे वर्तन त्याने केले. याप्रकरणी त्याच्याविरूद्ध कोयनानगर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्हयाचा तपास पोलीस उपअधीक्षक अंगद जाधवर हे करत आहेत.