कारला दुसरं वाहन घासलं, त्यानं फाईट मारून चालकाच्या नाकाचं हाड फ्रॅक्चर केलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरात वाहनांची संख्या वाढल्याने छोटे मोठे अपघात वाढले आहेत. त्यात वाहनांचे किरकोळ नुकसान होऊ लागले आहे. त्यातून भांडणे मारामाऱ्याचे प्रमाणही वाढले आहे. येरवडा गाडीतळावर असाच एका कारला दुसरी कार घासून गेली. दोघांमध्ये तावातावाने भांडणे झाली. त्यात एकाने दुसऱ्या चालकाला इतक्या जोरात फाईट मारली की त्याच्या नाकाचे हाडच फ्रॅक्चर झाले.

याप्रकरणी चेतन राजेंद्र शिनगारे (वय २७, रा. फुलगाव, ता. हवेली) यांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अश्विन रघुनाथ रायकर (वय २३, रा. धायरीगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, चेतन शिनगारे हे आपल्या कारने बाणेरहून घरी फुलगावला चालले होते. येरवडा गाडीतळ चौकात अश्विन रायकर यांची कार शिनगारे यांच्या कारला घासरली. तेव्हा रायकर हे स्वत: गाडीतून खाली उतरुन शिनगारे यांच्याजवळ आले. माझ्या कारचे नुकसान झाले आहे, असे म्हणून शिनगारे यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. त्यांच्या चेहऱ्यावर त्यांनी हाताने इतकी जोरात फाईट मारली की, त्यामुळे त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले. शिनगारे यांनी उपचार घेतल्यानंतर आता फिर्याद दिली असून पोलिसांनी अश्विन रायकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like