देशी कट्ट्यासाठी केला मित्राचा खून

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन 

देशी कट्टा मिळविण्यासाठी आकाश तुपे (२५) या तरूणाचा मित्रानेच खून केल्याची घटना अकोल्यात घडली आहे. आकाश हा ९ सप्टेंबरपासून बेपत्ता होता. खदान पोलिस ठाण्यात तो हरविल्याची तक्रार कुटुंबीयांनी दाखल केली होती. आकाशला शोधण्यासाठी पोलिस त्याच्या मोबाईल लोकेशनचा तपास पोलिस करत होते. या तपासातूनच आकाशचा मित्र विठ्ठल भारती यानेच त्याची हत्या केल्याचे उघड झाले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a5c7c8ec-cc4a-11e8-a4d4-d3c4cde2a13a’]

आकाशच्या कुटुंबियांनी तो हरविल्याची तक्रार अकोला पोलिस ठाण्यात नोंदविली होती. त्यांनतर पोलिसांनी आकाशचा शोध सुरू केला. हे बेपत्ता प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी बेपत्ता आकाशचा शोध घेण्यासाठी त्याच्या मोबाईलचे लोकेशन शोधण्यास सुरू केले. पोलिस तपास करत असताना आकाशच्या मोबाइलचे लोकेशन वारंवार बदलत होते. सोमवारी त्याचे लोकेशन अकोल्यातील सिंधी कॅम्प परिसरातील रामेश्वर शंकरधाम मंदिर परिसरात असल्याचे आढळून आले.

आरतीला बोलावले अन ‘ते’ प्रसादाच्या स्टॉलवर कारवाई करुन गेले

पोलिसांनी तेथे जाऊन चौकशी केली असता आकाशचा फोन त्याचा मित्र विठ्ठल भारती याच्याकडे सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आकाशच्या खुनाची कबुली दिली. देशी कट्ट्यासाठी आपण आकाशला ठार मारल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. विशेष म्हणजे विठ्ठल हा शंकरधाम मंदिरात पुजारी म्हणून काम पाहतो.

[amazon_link asins=’B0784BZ5VY,B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5e51c21b-cc4b-11e8-ae51-0360ffc880f0′]