12 लाखाचे सावकारी कर्ज फेडण्यासाठी त्याने रचला चोरीचा बनाव, मात्र पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन

आपल्यावर असलेले सावकारकीचे 12 लाख रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी रांका ज्वेलर्सच्या तब्बल दिड कोटी रुपयांच्या दागिन्यांची जबरी चोरी झाल्याचा बनाव रचनाऱ्या आॅफिसबाॅयला त्याच्या कुटुंबियासह चाैघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. यावेळी पोलिसांनी कर्णफुले, सोन्याच्या माळा, हिरेजडीत दागिने, प्लॅटीनम, पाचू, मोती, असा एकूण 1 कोटी 48 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

अजय मारुती होगाडे (वय-21 धंदा- नोकरी, रा. सायन, कोळीवाडा मुबंई), शरद मारुती होगाडे (धंदा- नोकरी, रा. सायन, कोळीवाडा मुबंई), मारुती बाबू होगाडे (वय-55 रा. कोळीवाडा, सायन मुंबई) अन्नु कुमार (मद्रासी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सदर प्रकरणातील तीन आरोपी हे एकाच कुटुंबातील असून ते मुळचे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील पाचाड गावचे रहिवाशी आहेत.

[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0cf16a2e-93e2-11e8-bc52-bb9c7386082e’]

चोरी झाल्या बनाव रचणारा मुख्य सुत्रधार अजय होगाडे हा मागील तिन महिन्यापासून रांका ज्वेलर्सच्या काळबा देवी मुंबई येथील शाखेत आॅफिसबाॅय म्हणून काम करतो. 26 जुलै रोजी (शुक्रवार) त्याच्यावर तयार केलेले सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने  पुण्याला घेऊन जाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यावेळी आपल्यावर असलेले 12 लाखांचे सावकारी कर्ज फेडण्यासाठी त्याच्या डोक्यात चोरीचा बनाव रचण्याची कल्पना आली. ठरल्याप्रमाणे मुख्य आरोपीने आपला भाऊ व एक मित्र यांच्या  मदतीने आपल्यावर वार करुन दागिने लुटल्याचा कांगावा केला.

पहा अशी घडली होती घटनाः

मुंबईहून पुण्याला हिरे व सोन्याचे दागिने घेवून येणाऱ्या  रांका ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्याला मारहाण करुन लुटल्याची खळबळजणक  घटना 26 जुलै (शुक्रवार) रोजी रेल्वे स्टेशन च्या फलाट क्रमांक 6 वर घडली होती.  बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीत सदरचा प्रकार घडला होता. संबंधीत व्यक्ती रांका ज्वेलर्समध्ये काम करत आहे. तो मुंबईवरून पुण्यात हिरे घेऊन येत होता. फलाट क्रमांक 6 वर उतरुण बाहेर पडत असताना, अचानक अज्ञात चार लोकांनी त्याला मारहाण करत दागिणे घेऊन पळ काढला होता.

[amazon_link asins=’B015QWEHLO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’21cc7714-93e2-11e8-8496-ed395ebf131e’]

दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना फिर्यादी अजय होगाडे याच्या पाठीवर व पोटावर झालेल्या जखमा ह्या चाकूने वार केल्यानंतर जशा जखमा होतात तशा प्रकारच्या नसल्याच्या संशय गुन्हे शाखेच्या पोलिसांना आला. आरोपी पुण्यात किती वेळा आला  तसेच त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती कशी आहे याची माहिती मिळवली.  शेवटी पोलिसी  खाक्या दाखवताच त्याच्या कुटुंबावर असलेले सावकाराचे 12 लाखांचे कर्ज फेडण्यासाठी स्वताःच्या अंगावर चाकूने वार करत चोरीचा बनाव रचला असून, सर्व दागिणे त्याचा भाऊ मारुती होगाडे व त्याचा मित्र अन्नु कुमार (मद्रासी) यांच्याकडे राहते घरी पाठवून दिल्याचे कबूल केले. तसेच गुन्ह्यातील मुद्देमाल त्याचे मुळगाव रायगडवाडी, पोस्ट पाचाड, ता. महाड, जिल्हा. रायगड येथे डोंगर पायथ्याला खड्डा करुन एका डब्ब्यात ठेवले आहेत. पोलिसांनी दागिणे लपवलेला डब्बा दोन पंचाना बोलावून ताब्यात घेतला.

शहरात वारंवार घडत आहेत ज्वलेर्सचे दागिने नोकरांनीच लुटल्याच्या घटनाः

रांका ज्वेलर्सचे दागिने लुटल्याची ही काही पहिलीच घटना नसून, एका वर्षातील अंदाजे ही तिसरी घटना आहे. सोनगिरा ज्वेलर्समधील दागिने घेवून नेपाळी नोकरांनीच पळ काढला होता. त्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नेपाळकडे जाताना बेड्या ठोकल्या होत्या, तर अन्य एका ज्वेलर्सच्या मालकाचे दागिने मुंबईहून घेऊन येणाऱ्या नोकराने सुद्धा दागिण्याची बॅग  पळविल्याचा बनाव रचला होता. त्यामुळे  नामांकित ज्वेलर्सकडे काम करणाऱ्या नोकरांनीच दागिन्यांची चोरी केल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. कमी पगारावर काम करण्यासाठी कामगार मिळतात म्हणून ,अनेकदा ज्वेलरीचा व्यावसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून नोकरांना कामावर ठेवताना त्यांची पुरेपूर माहिती घेतली जात नाही. त्याच्यातूनच अशाप्रकारचे गंभीर गुन्हे घडत आहेत.

[amazon_link asins=’B075MHBDN4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’32aed251-93e2-11e8-b553-c33589b25d2e’]

पोलिसांचे व्यावसायिकांना आवाहनः
ज्वेलर्स व्यावसायिकांच्याकडे काम करणाऱ्या नोकरांनीच चोरीचा बनाव रचत चोरी केल्याच्या वाढत्या घटना पाहता, वारंवार पोलिसांकडून व्यावसायिकांना देखील आवाहन करण्यात येत आहे. एखादा कर्मचारी कामावर ठेवताना त्याची पार्श्वभूमी कशाप्रकारची आहे याची माहिती घ्यावी. तसेच एवढा मोठा सोन्याच्या दागिण्याचा एेवज केवळ एका व्यक्तीमार्फेत न पाठवता त्याच्याबरोबर एखादा सुरक्षा रक्षक असावा, तसेच दागिण्यांची वाहतूक सुरक्षित गाडीच्या माध्यामातून करावी, जर कोणत्याही प्रकारची संशयास्पद माहिती मिळाली तर त्याची तात्काळ माहिती पोलिसांना द्यावी.अशा प्रकारचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आलं आहे.
सदरची कामगिरी पुणे शहराच्या पोेलीस आयुक्त रश्मी शुक्ला, सह पोलीस आयुक्त रविंद्र कदम, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख, यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक राहुल घुगे, पोलीस कर्मचारी प्रमोद मगर, धिरज भोर, मंगेश पवार, फिरोज बागवान, अविनाश मराठे, रमेश गुरूड, उद्य काळभोर, सुधीर इंगळे, एकनाथ खंदारे, महेश कदम, मनोज शिंदे, प्रदीम शिंदे, शिवानंद बोले, संतोष मते, नारायण बनकर यांनी केली.